एक्स्प्लोर

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, हॉटेल्स मिळेना म्हणून चाहत्याकडून हॉस्पिटलचे बेड बूक

World Cup 2023 : पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

India vs Pakistan Ahmedabad World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होणार आहे. भारतामध्ये विश्वचषकाची तयारी सुरु झाली आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना  15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.  प्रत्येकजण यासाठी तयारी करत आहेत. प्रत्येकाला हा सामना स्टेडिअममध्ये पाहायचा आहे. त्यासाठी तिकिटे आणि राहण्याची सोय करत आहेत. पण हॉटेलची तिकिटे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अमहादाबादमध्ये हॉटेलच्या किंमतीमध्ये दहापटीने वाढ झाली आहे. तरीही अहमदाबादमधील हॉटेल फुल आहेत, त्यामुळे एका दिवसासाठी राहण्यासाठी काही चाहत्यांनी चक्क हॉस्पिटलमधील बेड बूक केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये हॉटेल उपलब्ध नाहीत, त्यामुळे चाहत्यांनी हॉस्पिटलचे बेड्स बूक केले आहेत. 

मनीकंट्रोल वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे.  अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले की, लोकांनी फूल बॉडी चेकअप करण्यासोबतच एका रात्रीसाठी बेड बूक करत आहेत.  लोक हॉस्पिटलचा बेड अथवा रुम बूक करत आहेत. आमच्याकडे मर्यादीत जागा आहेत. त्यामुळे रुग्णांना पाहून बुकिंगबाबात विचार सुरु आहे.

डॉक्टर म्हणाले की, 'माझ्याकडे यूएसएच्या एका मित्राचा फोन आला, त्याने हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे विचारपूस केली. तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी भातात येणार आहे. यादरम्यान, तो रुग्णालयातील मेडिकल फॅसिलीट घेणार आहे. '

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादमधील हॉटेलच्या रुमचे दर दहापटीने वाढले आहेत. काही हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी एक लाख रुपये घेतले जात आहेत. विश्वचषकाची सुरुवात अहमदाबादमध्ये होणार आहे, त्याशिवाय अखेरचा सामनाही अहदाबादमध्येच होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामनाही अहमदाबादमध्ये होणार आहे. 15 ऑक्टोबरला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच लढत होते. त्यामुळे या लढतीकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष असते. क्रीडा चाहते आतुरतेने या सामन्याकडे पाहताता. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना होणार आहे. 

आणखी वाचा :

India-Pak : मौका मौका, भारत-पाक हायव्होल्टेज मॅच, आतापासूनच हॉटेल फुल्ल, 5 हजाराचा दर 50 हजारावर!

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, फ्लाईट्स तिकिटात 300 टक्क्यांनी वाढ, मुंबई-अहमदाबादचे तिकिट 22 हजार रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget