(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Womens World Cup 2022 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य
भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज इंग्लंडच्या महिला संघाने पराभव केला आहे. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला आहे.
Womens World Cup 2022 : महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज इंग्लंडच्या महिला संघाने पराभव केला आहे. भारताचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना होता. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला आहे. प्रथम फलदांजी करताना भारतीय महिला संघ 134 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या इंग्लंडच्या महिला संघाने केवळ 31 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 136 धावा करुन विजय मिळवला.
दरम्यान, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघासमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघ 36 षटकातच ऑल आऊट झाला होता. भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यानंतर भारतीय संघाला आपला डाव सावरता आला नाही.
महिला विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 गडी राखून मात केली आहे. इंग्लंडसमोर 135 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. जे संघाने 31.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. विजयात नाबाद 53 धावा करणाऱ्या कर्णधार हीदर नाइटने मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेत सलग तीन पराभवानंतर गतविजेत्या इंग्लंडचा हा पहिला विजय आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला केवळ 135 धावा करता आल्या आणि 36.2 षटकांत सर्वबाद 135 धावा केल्या. स्मृती मानधनाने 35 सर्वाधिक धावा केल्या, तर रिचा घोषने 33 धावा केल्या. या धावांच्या बळवर भारतीय महिला संघाने 134 धावापर्यंत मजल मारली होती. ईएनजीकडून शार्लोट डीनने 4 बळी घेतले.
भारतीय महिला संघाचा दुसरा पराभव
भारतीय महिला संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. इंग्लंडपूर्वी न्यूझीलंडने भारताचा 62 धावांनी पराभव केला होता. टीम इंडियाने आत्तापर्यंत खेललेल्या 4 सामन्यांमध्ये 2 मॅच जिंकल्या आहेत आणि 2 मॅच गमावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: