एक्स्प्लोर

Womens U19 T20 WC 2023: अंडर 19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज, समोर इंग्लंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

INDW vs ENGW U-19 T20 WC: अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला मात देत फायनल गाठली आहे.

Team India in WC : स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने मात देत भारताने फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.याआधी टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं होत. 

अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची फायनल आज (29 जानेवारी) पार पडणार असून भारताचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना म्हणजेच आज 29 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता ही फायनल अगदी चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय वर्ल्डकपमधील संघाची कामगिरी 

अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये (Under 19 Womens T20 World Cup) भारताची कामगिरीही (Team India) देखील चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतानं आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

कधी, कुठे पाहाल सामना?

भारत आणि न्यूझीलंड हा महिला अंडर 19 विश्वचषकातील सामना आज अर्थात रविवारी 29 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.45 मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे.  

सेमीफायनलचा लेखा-जोखा

सेमीफायलनमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्याचा विचार करता भारताने भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. न्यूझीलंड संघाला स्वस्तात रोखून नंतर आक्रमक खेळाच्या जोरावर विजय मिळवण्याची भारताची रणनीती होती. जी यशस्वी देखील झाली. अवघ्या 107 धावाच न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत करु शकला. प्लिमर हिने सर्वाधिक 35 धावा यावेळेस केल्या. भारताकडून परश्वी चोप्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तितास सिद्धू, शेफाली वर्मा, मन्नत कश्यप, अर्चना देवी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ज्यानतर फलंदाजीला आलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. ज्यामुळे केवळ 14.2 षटकांत दोन विकेट्स गमावून भारताने 110 धावा करत 8 विकेट्सनी मॅच जिंकली. यावेळी श्वेता शेहरावत हिने नाबाद 61 धावांची तर शेफालीने 10 सौम्याने 22 आणि गोंगादी त्रिशाने नाबाद 5 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताने 8 विकेट्सने सामन्यात विजय मिळवला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
Gulabrao Patil : धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
PM Kisan : पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील 6000 रुपयांची चिंता मिटली, सरकारनं अर्थसंकल्पात केली मोठी तरतूद
पीएम किसान सन्मान निधीसाठी 63 हजार कोटींची तरतूद, शेतकऱ्यांच्या 6000 रुपयांचा प्रश्न मार्गी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊतTop 50 News : टॉप 50 : बातम्यांचं अर्धशतक : ABP Majha : 02 Feb 2025 : Marathi NewsPandharpur Vitthal Rakhumai Marriage : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळाABP Majha Headlines : 12 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
Gulabrao Patil : धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
PM Kisan : पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील 6000 रुपयांची चिंता मिटली, सरकारनं अर्थसंकल्पात केली मोठी तरतूद
पीएम किसान सन्मान निधीसाठी 63 हजार कोटींची तरतूद, शेतकऱ्यांच्या 6000 रुपयांचा प्रश्न मार्गी
माऊली..लग्न घटिका आली समीप, भक्त वऱ्हाडींना अक्षता वाटल्या, विठ्ठल - रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भक्तांची मांदियाळी, पहा PHOTO
माऊली..लग्न घटिका आली समीप, भक्त वऱ्हाडींना अक्षता वाटल्या, विठ्ठल - रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भक्तांची मांदियाळी, पहा PHOTO
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? 5 लाख रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी कसा कराल अर्ज? 
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? 5 लाख रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी कसा कराल अर्ज? 
Emily Willis : अवघ्या 25 वर्षीय पोर्नस्टारच्या संपूर्ण शरीरावर लकवा मारला, आयुष्यभरासाठी झाली विकलांग; कुटुबीयांचा सुद्धा गंभीर आरोप
अवघ्या 25 वर्षीय पोर्नस्टारच्या संपूर्ण शरीरावर लकवा मारला, आयुष्यभरासाठी झाली विकलांग; कुटुबीयांचा सुद्धा गंभीर आरोप
Bus Accident : त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, बसचे अक्षरशः दोन तुकडे; सात जणांचा करूण अंत
त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, बसचे अक्षरशः दोन तुकडे; सात जणांचा करूण अंत
Embed widget