Women's T20 WC 2023 : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड मात्र एका विजयासही अव्वल, पाहा संपूर्ण पॉईंट टेबल
Womens T20 World Cup 2023 : महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 7 विकेट्सने जिंकला आहे.
Womens T20 World Cup : महिला T20 विश्वचषक स्पर्धेत (Womens T20 World Cup 2023) भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) खेळला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. संघाच्या या विजयात फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जचा मोठा हात होता. तिने संघासाठी नाबाद अर्धशतक झळकावलं. पहिल्या विजयानंतरही टीम इंडिया त्यांच्या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ एका विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. पॉइंट टेबलची संपूर्ण स्थिती काय आहे ते जाणून घेऊया.
विजयानंतरही टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर का?
भारतीय संघ ग्रुप-2 मध्ये इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजसह आहे. या गटात आयर्लंड वगळता इतर सर्व संघांनी 1-1 सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी पहिला सामना गमावला असून हे दोन्ही संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर पहिला सामना जिंकूनही भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय इंग्लंड एका विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्य़ा संघाचा नेटरनरेट भारतापेक्षा चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा नेटरनरेट +2.767 आहे. तर भारताचा रन रेट +0.497 आहे. दोन्ही संघांनी 1-1 समना जिंकून 2-2 गुण मिळवले आहेत.
गट-2 मधील संघांची स्थिती
एका सामन्यात इंग्लंड 1 विजय, 2 गुण आणि +2.767 नेटरनरेट .
एका सामन्यात भारत 1 विजय, 2 गुण आणि +0.497 नेटरनरेट .
आयर्लंडने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
पाकिस्तानचे एका सामन्यात 1 पराभव आणि -0.497 च्या नेटरनरेटने 0 गुण आहेत.
एका सामन्यात 1 पराभव आणि -2.767 च्या नेटरनरेटने वेस्ट इंडिजचे 0 गुण.
गट-1 मधील संघांची स्थिती
ऑस्ट्रेलियाने एका सामन्यात 1 विजय, 2 गुण आणि +4.850 धावांचा दर.
एका सामन्यात श्रीलंका 1 विजय, 2 गुण आणि +0.150 नेटरनरेट.
बांगलादेश पहिला सामना खेळत आहे.
एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 1 पराभव, 0 गुण आणि -0.150 नेटरनरेट.
एका सामन्यात न्यूझीलंडचा 1 पराभव, 0 गुण आणि रन रेट -4.850.
भारतानं पार केलं 150 धावाचं लक्ष्य
पाकिस्तानने दिलेलं 150 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटिया यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. पण 38 धावांवर यस्तिका भाटिया हिच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. यस्तिका हिने 17 धावांची खेळी केली. त्यानंतर जेमिमा आणि शफाली वर्मा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण संधूने शफालीला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. शफाली वर्मा 33 धावांवर बाद झाली. त्यनंतर जेमिमा हिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत भागीदारी करत विजयाकडे आगेकूच केली होती. पण पुन्हा एकदा संधू हिने विकेट घेत भारताला धक्का दिला. हरमनप्रीत कौर 16 धावा काढून तंबूत परतली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. पण जेमिमा आणि ऋचा घोष यांनी संयमी अन् तितकीच आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या चार षटकात 41 धावांची गरज होती. त्यावेळी दोघींनी वादळी खेळी केली. दोघांनी अवघ्या तीन षटकात 41 धावांचा पाऊस पाडला. 17 व्या षटकात ऋचा घोष हिने सलग तीन चौकार लगावत पाकिस्तानच्या तोंडूव विजय हिसकवला. जेमिमाने 19 षटकात उरलीसुरली कसर पूर्ण केली. ऋचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी केली. जेमिमाने 53 धावांच्या खेळीत 8 चौकार लगावले. तर ऋचा घोष हिने 31 धावांच्या छोटेखानी खेळीत पाच चौकारांचा पाऊस पाडला.
हे देखील वाचा-