एक्स्प्लोर
IND vs UAE Womens Asia Cup : भारतीय महिलांची विजयी मालिका सुरुच, युएईवर 104 धावांनी मिळवला विजय, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs UAE : महिला आशिया कपमध्ये सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet Outer Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या आजच्या सामन्यात भारतानं युएई महिला संघाला 104 धावांनी मात दिली आहे.
![IND vs UAE Womens Asia Cup : भारतीय महिलांची विजयी मालिका सुरुच, युएईवर 104 धावांनी मिळवला विजय, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर Womens Asia Cup 2022 India Women beats UAE Women by 104 runs in know top 10 points IND vs UAE Womens Asia Cup : भारतीय महिलांची विजयी मालिका सुरुच, युएईवर 104 धावांनी मिळवला विजय, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/5024b3a8dee29348f66154e70dc27c6d1664881898949127_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs UAE
IND vs UAE : भारतीय पुरुषांना यंदाचा आशिया चषक जिंकता आला नसला तरी भारतीय महिला मात्र महिलांच्या आशिया कप स्पर्धेत (Womens Asia Cup) कमाल कामगिरी करत आहेत. आजच्या भारत विरुद्ध युएई (India vs UAE) सामन्यात भारतीय महिलांनी 104 धावांच्या तगड्या फरकानं युएई संघाला मात दिली. या विजयासह भारतीय महिलांनी स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवत विजयाची हॅट्रीक केली आहे, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs UAE 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून भारताने सामना जिंकला आहे.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- ज्यानंतर भारतानं यूएईसमोर 20 षटकांत 179 धावांचं लक्ष्य ठेवलं.
- भारतीय सलामीवीर सुभेनेनी मेघना आणि ऋचा घोष या स्वस्तात तंबूत परतल्या, सुभेनेनी मेघना 10 धावा तर, ऋचा घोष 1 धाव करून बाद झाली.
- दयालन हेमलताही 2 धावा करून स्वस्तात माघारी परतली. पण त्यानंतर मैदानात आलेल्या दिप्ती शर्माने 49 चेंडूत 64 धावा तर आणि जेमिमाह रॉड्रिग्सनं 45 चेंडूत 75 धावा ठोकत डाव सावरला.
- यूएईकडून छाया मुघल, महिका गौर, ईशा रोहित ओझा आणि सुरक्षा कोट्टे यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
- 179 धावा करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यूएईच्या संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर तिर्था सतीश आणि इशा रोहित ओझा स्वस्तात माघारी परतले.
- त्यानंतर कविशानं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिनं या सामन्यात 54 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केली. कविशानंतर फक्त खुशी शर्मानंच 29 धावांची खेळी केली. या सामन्यात यूएईच्या संघ विकेट्स वाचवले. परंतु, संथ खेळीमुळं निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात यूएईला 104 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
- भारताकडून राजेश्वरी गायकवाडला सर्वाधिक दोन विकेट्स मिळाल्या. तर, दयान हेमलताच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
- हा सामना जिंकत भारतानं आशिया कपमधील सलग तीन सामने जिंकले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)