(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup : पाकिस्तानची टी20 विश्वचषकातील कामगिरी 'या' एका गोष्टीवर अवंलंबून, रिकी पॉटिंग स्पष्टच बोलला
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. यावेळी भारत-पाकिस्तान एकाच गटात आहेत.
Ricky ponting : टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेला आता काही महिने शिल्लक असून सध्या जागतिक क्रिकेटमध्ये (World Cricket) संघातील चुरस पाहता एक दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. त्यात भारत-पाकिस्तान (India and Pakistan) एकाच गटात असल्याने हा महामुकाबलाही पाहायला मिळेल. दरम्यान स्पर्धेबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने (Ricky Ponting) पाकिस्तान संघाच्या (Pakistan Cricket Team) खेळाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानची स्पर्धेतील कामगिरी ही कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) खेळीवर अवलंबून असेल, असं पॉटिंग म्हणाला आहे. आयसीसीशी (ICC) बोलताना पॉटिंगने ही प्रतिक्रिया दिली आहे.
आयसीसीने (ICC) दिलेल्या वृत्तात पॉटिंग म्हणाला,'जर बाबर आझम यंदाच्या विश्वचषकात धावा बनवेल आणि चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर पाकिस्तान संघाची कामगिरीही स्पर्धेत चांगली असेल. पण पाकिस्तान ही स्पर्धा जिंकेल असं मला वाटत नाही,' असंही पॉटिंग म्हणाला.
'ऑस्ट्रेलिया-भारत फायनलमध्ये'
स्पर्धेतील फायनलिस्टबद्दल बोलताना पॉटिंग म्हणाला भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia Cricket Team) हे संघ टी20 वर्ल्ड कप फायनल खेळणार असून ऑस्ट्रेलिया भारताला मात देऊन ट्रॉफी उंचावेल. ऑस्ट्रेलिया आणि भारताशिवाय यंदा टी20 विश्वचषकात इंग्लंडचा संघ (England Cricket Team) एक मोठं आव्हान असणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम फॉर्मात आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघही विश्वचषकात चांगली कामगिरी करु शकतो. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड हे संघच ट्रॉफी उंचवणार असं पॉटिंगने म्हटलं आहे.
हे देखील वाचा-
- Womens T20 WC Host : 2024 ते 27 दरम्यानच्या आयसीसीच्या महिला क्रिकेट स्पर्धाचं वेळापत्रक ठरलं, भारताकडेही यजमानपद, वाचा सविस्तर
- IND vs WI : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज, एक विजय आणि 39 वर्षांत पहिल्यांदाच करणार 'ही' कामगिरी
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी