Babar Azam: श्रीलंका दौऱ्यात बाबर आझम करतोय एकामागून एक विक्रम!
Babar Azam completes 3000 runs in Test cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर (Babar Azam) आझमनं कसोटी क्रिकेटमधील महत्वाचा टप्पा गाठलाय.
Babar Azam completes 3000 runs in Test cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) कसोटी क्रिकेटमधील महत्वाचा टप्पा गाठलाय. श्रीलंकाविरुद्ध (SL vs PAK) गाले (Galle) येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात बाबर आझमनं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर त्यानं दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकलंय. या कामगिरीसह त्यानं कसोटी क्रिकेटमधील 3000 धावा पूर्ण केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये बाबर आझमची दमदार कामगिरी
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात बाबर आझम 55 धावांवर असताना श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्यानं त्याला बाद केलं. बाबरनं कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 73 डावात 47.26 च्या सरासरीनं 3 हजार 25 धावा केल्या आहेत. ज्यात 7 शतक आणि 22 अर्धशकांचा समावेश आहे.
ट्वीट-
पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत
गाले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघानं पाकिस्तानसमोर 342 धावांचं लक्ष्य ठेवलंय. प्रत्युत्तरात पाकिस्तानं चौथ्या दिवसाअखेर तीन विकेट्स गमावून 222 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिजवान (7 धावा) आणि अब्दुल्ला शफीक 112 धावांसह नाबाद माघारी परतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला पाचव्या दिवसांत 120 धावांची गरज आहे. तर, पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेला सात विकेट्स घ्यावा लागतील.
श्रीलंकेचं पाकिस्तानसमोर 342 धावांचं लक्ष्य
या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 222 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाल पहिल्या डावात 218 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात चार धावांची आघाडी मिळालेल्या श्रीलंकेच्या संघानं पाकिस्तान समोर 342 धावांचं लक्ष्य ठेवलं.
हे देखील वाचा-
- Yuvraj Singh on Ben Stokes Retirement: 'काही हरकत नाही...' बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर युवराज सिंह भावूक!
- England Cricket : 'जेम्स अँडरसनसोबत एकाच संघात खेळण्यासाठी कमालीचा उत्साही' : वॉशिंग्टन सुंदर
- Ben Stokes Retirement : बेन स्टोक्सच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीला ICC जबाबदार, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा