WI vs IND 1st ODI: सामना हातातून निसटतोय हे दिसताच धवननं लढवली शक्कल, अन् यशस्वीही ठरला!
West Indies vs India: वेस्ट इंडीजविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 3 धावांनी (WI vs IND) विजय मिळवलाय.
West Indies vs India: वेस्ट इंडीजविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 3 धावांनी (WI vs IND) विजय मिळवलाय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडीजसमोर 309 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला कडवी झुंड दिली. परंतु, अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजनं भेदक गोलंदाजी करत भारताला 3 धावांनी विजय मिळवून दिला. हा सामना अतिशय रोमांचक होता. या सामन्यातील अखेरच्या षटकात भारतीय संघानं नेमकी कोणती रणनीती बनवली? ज्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ पराभूत झाला. यावर कर्णधार शिखर धवननं भाष्य केलंय.
शिखर धवन काय म्हणाला?
शिखर धवन म्हणाला की, "वाटलं नव्हतं की हा सामना इतक्या रोमांचक होईल. या सामन्यातील अखरेच्या षटकात आम्ही खेळाडूंना फाइन लेगमध्ये पाठवलं. ज्यामुळं दोन-तीन चौकार वाचवले गेले. या गोष्टीनं आम्हाला मदत केली. आम्हाला मैदानातील एका बाजूच्या लांबलचक सीमेचा वापर करायचा होता. अखेर आम्ही फाइन लेगवर दुहेरी धावा दिल्या. तसेच वेस्ट इंडीजच्या एका फलंदाजालाही बाद केलं. परंतु, प्रत्येक दिवस परफेक्ट नसतो."
वेस्ट इंडीजची भारताला कडवी झुंज
शिखर धवन (97), शुभमन गिल (64) आणि श्रेयस अय्यर (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं या सामन्यात 50 षटकांत 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनीही चांगली झुंज दिली. काइल मेयर्स (75), शामराह ब्रूक्स (46) आणि ब्रँडन किंग (54) यांनी विंडीज संघाला चांगल्या स्थितीत आणलं. त्यानंतर अकिल हुसेन (32) आणि रोमॅरियो शेफर्ड (39) यांच्यात सातव्या विकेटसाठी तुफानी अर्धशतकी भागीदारीमुळं भारतासमोर अडचणी निर्माण झाल्या. परंतु, अखेरच्या षटकात वेस्ट इंडीजला 15 धावांची आवश्यकता असताना भारतानं 3 धावांनी सामना जिंकला.
भारताची विक्रमाला गवसणी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना क्वीन्स पार्क ओव्हलच्या पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यापूर्वी भारतानं या मैदानावर 11 सामने खेळून 9 सामने जिंकले होते. मात्र, काल खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला धुळ चाखली. या विजयासह भारत एकाच मैदानावर सर्वाधिक विजय मिळवणारा पहिला संघ ठरलाय. भारतानं या मैदानावर आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Result : भारताचा वेस्ट इंडीजवर 3 धावांनी विजयी, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- IND vs WI, 1st ODI Result : रोमहर्षक सामन्यात भारत 3 धावांनी विजयी, वेस्ट इंडीजची झुंज व्यर्थ
- Team India : शिखर धवन कर्णधार होताच टीम इंडियाचा नकोसा विक्रम, श्रीलंकेच्या 5 वर्षे जुन्या रेकॉर्डची बरोबरी