WI vs BAN : वेस्ट इंडिजविरुद्ध 29 धावांवर बाद, तरी रचला तमिम इक्बालने इतिहास
WI vs BAN : सध्या बांग्लादेशचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून त्यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यातच तमिमने एक रेकॉर्ड केला आहे.
![WI vs BAN : वेस्ट इंडिजविरुद्ध 29 धावांवर बाद, तरी रचला तमिम इक्बालने इतिहास Wi vs Ban test match tamim iqbal 2nd most runs for bangladesh in test cricketer WI vs BAN : वेस्ट इंडिजविरुद्ध 29 धावांवर बाद, तरी रचला तमिम इक्बालने इतिहास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/e1fda13e0f6060ef5644893380ec171b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tamim Iqbal : वेस्टइंडीज आणि बांग्लादेश (WI vs BAN) यांच्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना एंटीगुआ येथे खेळवला जात आहे. या सामन्यात बांग्लादेशचा सलामीवीर तमिम इक्बालने (Tamim Iqbal) एक खास रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. सामन्याच्या पहिल्या डावात तामिम अवघ्या 29 धावा करुन बाद झाला पण याच वेळी त्याने एक विक्रम केला आहे. बांग्लादेशसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. बांग्लादेश संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तामिम दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
तमिमने आतापर्यंत 68 कसोटी सामने खेळत 129 डावात 5010 धावा नावावर केल्या आहेत. सध्या तामिम बांग्लादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमीमने या धावा करताना 10 शतकं आणि 31 अर्धशतकं लगावली आहेत. यावेळी त्याचा सर्वश्रेष्ठ टेस्ट स्कोर 209 रन इतका आहे. त्याच्या आधी मुशफिकूर रहीमचं नाव येतं. त्याने 82 सामन्यात 5 हजार 235 रन केले आहेत. यावेळी त्याने 9 शतकं आणि 25 अर्धशतकं लगावली आहेत. तर तिसऱ्या नंबरवर शाकिब अल हसनचा नंबर लागतो. त्याने 113 डावांत 4164 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 5 शतकं आणि 27 अर्धशतकं लगावली आहेत.
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे बांग्लादेशचे खेळाडू
मुशफिकुर रहीम - 5235 धावा
तमिम इक्बाल - 5010 धावा
शाकिब अल हसन - 4164 धावा
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)