Shubman Gill News : मैदानावर धुकं, टॉसला विलंब... त्यात सामन्यापूर्वी ट्विस्ट! उपकर्णधार शुभमन गिल अचानक मालिकेतून बाहेर, नेमकं काय घडलं?
India vs South Africa 4th T20I Match: टीम इंडियाचा टी-20 उपकर्णधार शुभमन गिल या सामन्यात खेळत नसल्याची माहिती मिळाली. अखेर गिलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का बसावं लागलं, हे जाणून घेऊया.

Shubman Gill Ruled OUT vs South Africa Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे खेळवला जात आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, सामन्याआधीच लखनऊमध्ये धुक्यामुळे नाणेफेक वारंवार उशिरा होत आहे. पंच आता संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा एकदा तपासणी करतील. शेवटच्या तपासणीदरम्यान, पंच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी परिस्थितीवर चर्चा करताना दिसले.
त्याचदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. टीम इंडियाचा टी-20 उपकर्णधार शुभमन गिल या सामन्यात खेळत नसल्याची माहिती मिळाली. अखेर गिलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का बसावं लागलं, हे जाणून घेऊया.
STORY | Shubman Gill out of T20I series with toe injury
— Press Trust of India (@PTI_News) December 17, 2025
Out-of-form India vice-captain Shubman Gill has been ruled out of the last two T20I games against South Africa with a toe injury, sources close to the team told PTI.
READ: https://t.co/RmgZBeEX1O pic.twitter.com/H9YslNoIVr
लखनऊमधील खराब हवामानामुळे टॉसला उशीर
लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मैदानात धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता होणारा टॉस सुमारे 20 मिनिटांनी पुढे ढकलण्यात आला. मैदानावर इतका स्मॉग होता की एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे पाहणेही कठीण झाले होते. दरम्यान, साडेसहा वाजताच एक महत्त्वाची बातमी समोर आली, शुभमन गिल या सामन्यात खेळणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्यामुळे तो खेळण्याच्या स्थितीत नव्हता.
टी-20 फॉरमॅटमध्ये शुभमन गिलचा फॉर्म चिंतेचा
शुभमन गिल सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सातत्याने धावा करत असला, तरी टी-20मध्ये मात्र त्यांचा बॅट शांत आहे. मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्याचा निकाल मालिकेची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतील गिलची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिल फक्त 4 धावा करू शकला. दुसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडताच शून्यावर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात त्याने 28 धावा केल्या खऱ्या, पण त्यांचा स्ट्राइक रेट जवळपास 100 च्या आसपास होता, जो टी-20 क्रिकेटसाठी समाधानकारक मानला जात नाही. शुभमन गिल हे टीम इंडियाचे उपकर्णधार असल्यामुळे दुखापत नसती तर त्याला सहजपणे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणं कठीणच झालं असतं.
हे ही वाचा -





















