एक्स्प्लोर

बुमराहची जागा कोण घेणार? दोन गोलंदाजांमध्ये टक्कर, भारताची संभाव्य प्लेईंग 11

IND vs ENG 4th Test : रांची कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीची धुरा आता मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. पण

IND vs ENG 4th Test : रांची कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीची धुरा आता मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. पण सिराजच्या जोडीला कोणता गोलंदाज असेल? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या चमूमध्ये सिराज वगळता दोन वेगवान गोलंदाज आहेत. त्या दोघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे.  इंग्लंडनं रांची कसोटीसाठी प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात भारताची प्लेईंग11 कशी असेल? हे काही तासांतच समजेल. 

सिराज करणार गोलंदाजीचं नेतृत्व - 

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. सिराजच्या जोडीला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला संधी मिळते? हे पाहणं औत्सुयक्याचं असेल. मुकेश कुमार आणि आकाशदीप असे दोन पर्याय रोहित शर्माकडे उपलब्ध आहे. या दोघांपैकी कुणाला संधी मिळेल, हे काही उद्या समजेल. आकाशदीप पदार्पण कऱणार का? की मुकेश कुमार याला संधी मिळणार? हे काही काही तासांत स्पष्ट होईल. 

आकाश दीप घेऊ शकतो बुमराहची जागा 

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कोण खेळणार? हा प्रश्न सध्या बीसीसीआयसमोर आहे. पण कदाचित बीसीसीआयला या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे आणि ते उत्तर म्हणजे, आकाश दीप. मूळचा बिहारचा असलेला वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो. अलीकडेच त्यानं इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. आकाशनं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 2 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या कसोटीत आकाश दीप टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. 

मालिकेत भारताचे वर्चस्व - 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील तीन सामने झाले आहेत. इंग्लंडनं (IND vs ENG) पहिल्याच कसोटी मालिकेत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जोरदार पलटवार दिला. विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी (Rajkot Test) जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. राजकोट कसोटी सामन्यात भारताने 434 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे चौथी कसोटी सामना होणार आहे. 


India’s updated squad for the 4th Test:  रांची कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगट सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप

Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार/ आकाश दीप

रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 - England 11 for the third Test vs India

जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर. 

Crawley, Duckett, Pope, Root, Bairstow, Stokes, Foakes, Anderson, Hartley, Bashir, Robinson

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget