एक्स्प्लोर

मोठी बातमी! रांची कसोटीसाठी इंग्लंडच्या 11 शिलेदारांची घोषणा, संघात 2 बदल

Team India vs England 4th Test Match: एमएस धोनीच्या (MS Dhoni) रांची शहरात होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं (England 11 for the third Test vs India) आपल्या 11 शिलेदारांची घोषणा केली आहे.

Team India vs England 4th Test Match: एमएस धोनीच्या (MS Dhoni) रांची शहरात होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं (England 11 for the third Test vs India) आपल्या 11 शिलेदारांची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. लागोपाठ दोन कसोटीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर इंग्लंड संघाने रणनितीमध्ये बदल केल्याचं दिसतेय. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. 

इंग्लंडच्या संघात दोन बदल कोणते ? 

वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि फिरकी गोलंदाज रेहान अहमद यांना इंग्लंड संघातून बाहेर बसवण्यात आलेय. तिसऱ्या कसोटीत बेंचवर असणाऱ्या ओली रॉबिन्सन आणि फिरकी गोलंदाज शोएब बशीर यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय.   

ओली रॉबिन्सन भारतामध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.  जेम्स अँडरसन याच्यासोबत नव्या चेंडूने तो गोलंदाजी करताना दिसेल. अँडरसनने तिसऱ्या कसोटी सामन्यात 38 षटके गोलंदाजी केली होती, पण त्याला फक्त एक विकेट घेण्यात यश आले होते. पण अँडरसनचा अनुभव तगडा आहे, त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीतही संधी दिली आहे. 

रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 - England 11 for the third Test vs India

जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर. 

Crawley, Duckett, Pope, Root, Bairstow, Stokes, Foakes, Anderson, Hartley, Bashir, Robinson
 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील तीन सामने झाले आहेत. इंग्लंडनं (IND vs ENG) पहिल्याच कसोटी मालिकेत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जोरदार पलटवार दिला. विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी (Rajkot Test) जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. राजकोट कसोटी सामन्यात भारताने 434 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे चौथी कसोटी सामना होणार आहे. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget