IND vs SA, T20 : भारत-दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेला होणार सुरुवात, कधी, कुठे पाहाल सामना?
India vs South Africa, Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे.
India vs South Africa 1st T20 : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी भारताने (team india) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळली. त्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला उद्या अर्थात 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असेल. कारण यावेळी नेमकी कोणत्या खेळाडूंना संघ व्यवस्थापन संधी देणार? आणि ते खेळाडू कशी कामगिरी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय मालिकेतील हा पहिला सामना असल्याने जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. त्यामुळे दोघांसाठी महत्त्वाचा हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
हा सामना उद्या अर्थात 28 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा-