ICC ODI Rankings: कर्णधार हरमनप्रीत कौरची टॉप-5 मध्ये एन्ट्री; स्मृति मानधना, दीप्ती शर्मालाही मोठा फायदा
ICC ODI Rankings: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 143 धावांची धामकेदार फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठा फायदा झालाय.
ICC ODI Rankings: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 143 धावांची धामकेदार फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठा फायदा झालाय. आयसीसीनं जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत हरमनप्रीत कौर पाचव्या क्रमांकावर पोहचलीय. हरमनप्रीत कौरसह सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मालाही (Deepti Sharma) मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय.
आयसीसीच्या ताज्या क्रमावारीनुसार, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्माच्या क्रमावारीत एका क्रमानं सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय. स्मृती मानधना सहाव्या तर, दिप्ती शर्मा 24 व्या स्थानावर पोहचलीय. इंग्लंडच्या चार्ली डीननं मंकडिंग आऊट केल्यानंतर दीप्ती शर्मा चर्चेत आली आहे.
पूजा वस्त्राकर, हरलीन देओलला मोठा फायदा
भारताची गोलंदाज पूजा वस्त्राकरलाही चार स्थानांचा फायदा झालाय. तिनं 53 व्या स्थानावर 49 व्या स्थानावर झेप घेतलीय. तर, हरलीन देओलनं 46 क्रमांची मोठी झेप घेत 81 व्या स्थानावर पोहचलीय. इंग्लंडची डॅनी व्हॅट 21 व्या क्रमांकावर आहे.तर, एमी जोन्स 30 व्या क्रमांकावर पोहचलीय. चार्ली डीननंही 62 व्या स्थानावर झेप घेतलीय.
महिला आशिया चषकात भारतीय संघाकडून मोठी अपेक्षा
तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघानं यजमान संघाचा 3-0 नं धुळ चारली. तब्बल 23 वर्षानंतर भारतीय महिला संघानं इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकलीय.येत्या 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात 1 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, 15 ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, यादव, के.पी.नवगिरे.
राखीव खेळाडू- तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.
हे देखील वाचा-