IND Vs WI: विराट कोहलीनं वेस्ट इंडीजविरुद्धच झळकावलं होतं अखेरचं शतक, एकट्याच्या जीवावर जिंकला होता सामना
IND Vs WI: वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी मालिकेत विराट कोहली आपल्या शतकांच्या दुष्काळ संपवणार का? याकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.
IND Vs WI: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) मागील काही महिन्यापासून एकही शतकं झळकलं नाही. कोहलीनं 14 ऑगस्ट 2019 रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात अखरेचं शतक केलं. तेव्हापासून विराट कोहलीची बॅट शांतच आहे. विराट कोहलीनं संघासाठी सातत्यानं धावा केल्या. परंतु, मोठी धावसंख्या उभारण्यास त्याला अपयश येत आहे. यातच येत्या 6 फ्रेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी मालिकेत विराट कोहली आपल्या शतकांच्या दुष्काळ संपवणार का? याकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.
पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघानं प्रथम फलंदाजी करून भारतासमोर 241 धावांच लक्ष्य दिलं. पावसामुळं हा सामना 35-35 षटकांचा खेळवण्यात आला. वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेलनं 41 चेंडूत 72 (8 चौकार, 5 षटकार) आणि एविन लुईसनं 29 चेंडूत 43 धावांची (5 चौकार, 3 षटकार) स्फोटक खेळी केली होती.
वेस्ट इंडीजनं दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 25 धावांवर पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर रोहित शर्माही 6 चेंडूत 10 झाला करून बाद झाला. तर, शिखर धवन 36 धावांची खेळी करून माघारी परतला. दोन्ही सलामीवीर मोठी खेळी करण्यास अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली एक जागा टिकून ठेवली. या सामन्यात कोहलीनं 99 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीनं नाबाद 114 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. कोहलीचे हे वनडे क्रिकेटमधील 43 वे शतक होतं. तेव्हापासून विराट कोहलीला एकही शतक झळकवता आलं नाही.
हे देखील वाचा-
- Team India: भारतीय क्रिकेटसाठी कठीण काळ, रवी शास्त्रींकडून राहुल द्रविडला 'खास' सल्ला
- Ind vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध कुलदीप यादवच्या संघात पुनरागमनावर हरभजनची प्रतिक्रिया, म्हणाला...
- Team India : 'या' पाच खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब कामगिरीमुळे वेस्ट इंडिज विरुद्ध संधी गमावली, यादीत दिग्गज गोलंदाजांचीही नावं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha