Carlos Brathwaite: आधी फलंदाजाला चेंडू मारला, त्यानंतर पंचाशी भिडला; कार्लोस ब्रॅथवेटचा व्हिडिओ व्हायरल
Derbyshine vs Birmingham Bears: वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार कार्लोस ब्रॅथवेट इंग्लंडच्या देशांतर्गत टी-20 टूर्नामेंट व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये बर्मिंगहॅम बियर्सकडून खेळत आहे.
Derbyshine vs Birmingham Bears: वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार कार्लोस ब्रॅथवेट (Carlos Brathwaite) इंग्लंडच्या देशांतर्गत टी-20 टूर्नामेंट व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये (Vitality T20 Blast) बर्मिंगहॅम बियर्सकडून खेळत आहे. दरम्यान, डर्बीशायर विरुद्ध सामन्यात ब्रेथवेटनं केलेल्या कृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सामन्यात त्यानं विरुद्ध संघातील फलंदाजाला चेंडू फेकून मारला. त्यानंतर पंचाशीही वाद घातला. ज्यामुळं पंचांनी त्याला पाच धावांची शिक्षा दिली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
इंग्लंडच्या देशांतर्गत टी-20 टूर्नामेंट व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये कार्लोस ब्रॅथवेट बर्मिंगहॅम बियर्सचं नेतृत्व करत आहे. रविवारी बर्मिंगहॅम बिअर्स आणि डर्बीशायर यांच्यात सामना पार पडला. यासामन्यादरम्यान, गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या ब्रॅथवेटनं डर्बिशाइनच्या वेन मॅडसेनला चेंडू फेकून मारला. ज्यामुळं पंचांनी त्याला फटकारलं. परंतु, त्यानंतर ब्रॅथवेटनं पंचाशीही वाद घालायला सुरुवात केली. ब्रॅथवेटच्या या कृत्यानं मैदानावरील पंच खूप संतापले आणि त्यांनी बर्मिंगहॅम बियर्सच्या संघाला पाच धावांच्या दंडाची शिक्षा दिली. ब्रॅथवेटचे हे खास कृत्य पाहून चाहतेही हैराण झाले असून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
व्हिडिओ-
डर्बीशायरविरुद्ध सामन्यात ब्रॅथवेटनं चार षटकात 29 धावा देत एक विकेट घेतली. मात्र, या सामन्यात बर्मिंगहॅम बियर्सच्या संघाला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात डर्बीशायरला जिंकण्यासाठी 45 चेंडूत 49 धावांची गरज असताना ब्रॅथवेटनं मैदानात पंचाशी हुज्जत घातली होती.
हे देखील वाचा-
- T20 Cricket Records : आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 7 वेळा स्कोरबोर्डवर 250+ धावसंख्या; अफगानिस्तानच्या नावावर सर्वात मोठी टोटल
- IND vs ENG: विराटसाठी इग्लंड दौरा खडतर! खराब फॉर्म अन् ॲंडरसनची भेदक गोलंदाजी, कोहलीसमोर पाच मोठे आव्हान
- IND vs ENG: बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी भारताच्या अडचणी वाढल्या, रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह
- INDW vs SLW: भारताविरुद्ध श्रीलंकेच्या महिला संघाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?