(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 Cricket Records : आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 7 वेळा स्कोरबोर्डवर 250+ धावसंख्या; अफगानिस्तानच्या नावावर सर्वात मोठी टोटल
Highest Total in T20I : अफगानिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात तब्बल 278 धावा ठोकण्याचा विक्रम केला आहे.
250+ Runs in T20I : सध्याच्या घडीला तिनही क्रिकेट फॉर्मेटमध्ये टी20 क्रिकेट प्रकार सर्वांचाच आवडता आहे. त्यामुळेच विविध देशांच्या क्रिकेट लीगही 20 षटकांच्या फॉर्मेटमध्येच पार पडतात. दरम्यान आजकाल वाढत्या फटकेबाजीमुळे 200 धावा इंटरनेशनल टी20 क्रिकेट सामन्यात होणं साधारण गोष्ट झाली आहे. पण 250 हून अधिक धावा होणं, एक मोठी गोष्ट आहे. अशामध्ये टी20 आतंरराष्ट्रीय सामन्यांना (T20I) 17 वर्षेच झाली असूनही 7 वेळा संघानी 250 हून अधिक धावा (250+ runs) केल्या आहेत. विशेष म्हणजे या रेकॉर्डमध्ये सर्वाधिक धावसंख्या ही कोणत्या दिग्गज संघाने केली नसून नवख्या अफगाणिस्तान संघाने केलेली आहे.
तर नेमकी ही यादी कशी आहे पाहूया...
1. अफगाणिस्तानने 23 फेब्रुवारी, 2019 रोजी आयर्लंडविरुद्ध 20 षटकात 3 विकेट्स गमावत तब्बल 278 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. टी20 क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
2. चेक रिपब्लिक संघानेही टी20 क्रिकेटमध्ये 278 रन केले असून त्यांनी तुर्कीविरुद्ध ही कमाल 30 ऑगस्ट, 2019 रोजी केली होती. याशिवाय चेक टीमने 12 मे, 2022 रोजीही 250 हून अधिक धावा बल्गेरियाविरुद्ध ठोकल्या आहेत. त्यांनी 2 विकेट्स गमावत 258 रन केले होते.
3. ऑस्ट्रेलियाने 6 सप्टेंबर, 2016 रोजी श्रीलंकेविरुद्ध 3 विकेट्स गमावत 263 रन केले होते.
4. श्रीलंका संघाने केनियाविरुद्ध 14 सप्टेंबर, 2017 रोजी 6 विकेट्स गमावत 260 रन स्कोरबोर्डवर लावले होते.
5. भारतीय संघाने देखील ही कमाल केली असून टीम इंडियाने 22 डिसेंबर, 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स गमावत 260 रन केले होते.
6. स्कॉटलंड संघाने 16 सप्टेंबर, 2019 रोजी नेदरलँड्सविरुद्ध 3 विकेट्सच्या बदल्यात 252 रन स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
हे देखील वाचा-