(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDW vs SLW: भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर; कधी, कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
INDW vs SLW: भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
INDW vs SLW: भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 19 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. भारताचं कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौर संभाळणार आहे. तर, चामारी अटापट्टू श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व करेल. ज्यात हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, ओशाधी रणसिंघे आणि इनोका रणवीरम या खेळाडूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहणाऱ्या श्रीलंकेच्या विश्मी गुणरत्नेलाही दोन्ही संघात स्थान मिळालं आहे.
भारत- श्रीलंका टी-20 मालिकेतील वेळापत्रक-
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 23 जून | आरडीआयसीएस, डंबुला |
दुसरा टी-20 सामना | 25 जून | आरडीआयसीएस, डंबुला |
तिसरा टी-20 सामना | 27 जून | आरडीआयसीएस, डंबुला |
भारत- श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 1 जुलै | पीआयसीएस, पल्लेकेले |
दुसरा एकदिवसीय सामना | 4 जुलै | पीआयसीएस, पल्लेकेले |
तिसरा एकदिवसीय सामना | 7 जुलै | पीआयसीएस, पल्लेकेले |
भारताचा एकदिवसीय संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिक भाटिया (विकेटकिपर), एस मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, तानिया भाटिया (विकेटकिपर), हरलीन देओल.
भारताचा टी-20 संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकिपर), एस मेघना, दीप्ति शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड़, सिमरन बहादुर, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रोड्रिग्स, राधा यादव.
भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर
चमारी अथापथु (कर्णधार), हसिनी परेरा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी, ओशाधी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरम, अचीनी कुलसूर्या, हर्षिता समरविक्रम, विश्मी गुणरत्ने, मलशा शेहानी, अमा कांचना, उदेशिका प्रबोधनी, रश्मी डी सिल्वा, हंसिमा करुणारत्ने, कौशली नुथ्यांगना, सत्या संदीपानी, थारिका शिववंडी.
हे देखील वाचा-