(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BPL 2022: सुनील नारायणची तुफानी खेळी, 23 चेंडूत झळकावलं अर्धशतक
Bangladesh Premier League Final: बांग्लादेश प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यात सुनील नारायणनं (Sunil Narine) आक्रमक फलंदाजी केलीय.
Bangladesh Premier League Final: बांग्लादेश प्रीमिअर लीगच्या (BPL) अंतिम सामन्यात सुनील नारायणनं (Sunil Narine) आक्रमक फलंदाजी केलीय. त्यानं फार्च्यून बरिशालविरुद्ध सामन्यात केवळ 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. नारायणनं 23 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 57 धावांची स्फोटक खेळी केली. यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. फॅनकोड ट्विटर हॅंडलवरून सुनील नारायणच्या आक्रमक खेळीचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.
बीपीएलच्या अंतिम सामन्यात कोमिला व्हिक्टोरियन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सुनील नारायणनं संघाला चांगली सुरुवात करुन दिलीय. पहिल्याच षटकापासून नारायणनं आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. नारायणच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोमिला संघानं पहिल्या षटकात 18 धावा केल्या. नारायणनं केवळ 10 चेंडूत 33 धावा केल्या. त्यानंतर नारायण आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्यानं केवळ 21 चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलंय.
व्हिडिओ-
नारायणचा फॉर्म केकेआरसाठी चांगला
बीपीएलमध्ये सुनील नारायणनं 7 डावात 31.80 सरासरीनं 159 धावा केल्या आहेत. दरम्यान, नारायणचा स्टाईक रेट 200 च्या जवळपास होता. तसेच 7 सामन्यात त्याला विकेट्स मिळाल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 6 धावा इतका होता. या खेळाडूच्या फॉर्ममुळं कोलकाता नाईट रायडर्सचा संघ खूप खूश असेल. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाताच्या संघानं सुनील नारायणला रिटेन केलं होतं.
हे देखील वाचा-
- IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडीजनं जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय
- IND Vs SL: विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही? स्टार ऑलराऊंडरचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता
- IND vs WI: आतंरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आवेश खानला पदार्पणाची संधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha