Team India Head Coach: न्यूझीलंड दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी; राहुल द्रविडचं काय?
Team India Head Coach: टी-20 विश्वचषकातील अपयशानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा (India Tour Of New Zealand) करणार आहे.
Team India Head Coach: टी-20 विश्वचषकातील अपयशानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा (India Tour Of New Zealand) करणार आहे. या दौऱ्यात भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात आलीय. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे टी-20 मालिकेत भारताचा तडाखेबाज फलंदाज हार्दिक पांड्या टी-20 संघाच्या कर्णधारपद संभाळणार आहे. तर, सलामीवीर शिखर धवन एकदिवसीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
हे देखील वाचा-