Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special Report
तुम्ही लहान मुलांना घेऊन कारनं प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेक देशांमध्ये कारमध्ये लहान मुलांना ड्रायव्हरच्या बाजूला बसवण्यास मनाई आहे. पण भारतात अशी ठोस नियमावली नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे नवी मुंबईत सोमवारी रात्री झालेला अपघात. या अपघातात कारमधील एअरबॅगमुळे सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...
कारमधली ही एअरबॅग
अपघातानंतर जीव वाचवणारी ठरते...
पण एका चुकीमुळे ही एअरबॅग जीवघेणीही ठरु शकते...
आणि याचाच प्रत्यय नवी मुंबईत घडलेल्या या दुर्दैवी घटनेतून आला....
या झटक्यामुळे सहा वर्षांच्या हर्षचा मृत्यू झाला...
या घटनेनंतर लहान मुलांना कारमध्ये पुढे बसवण्याबाबतचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.
अनेक देशांमध्ये कारमध्ये विशिष्ट वयापर्यंत
मुलांना कारमध्ये पुढे बसण्यास मनाई आहे,
आणि मागच्या सीटवर बेबी सीट किंवा चाईल्ड सीट
बसवणं देखील बंधनकारक आहे
पण भारतात मात्र अशी कोणतीही ठोस नियमावली नाही, आणि लोकांमध्ये देखील पुरेशी जनजागृती नाही