Team India : टीम इंडियात पडली फूट? कोहली-गंभीरची टाळाटाळ अन् रोहित शर्माचंही मौन, सराव सत्रात नेमकं काय घडलं?
India vs South Africa : भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंगरूममधील मतभेदांच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत.

India vs South Africa 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंगरूममधील मतभेदांच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत. मंगळवारी (2 डिसेंबर) रायपुरमध्ये झालेल्या टीम इंडियाच्या (Team India) ट्रेनिंग सत्रातही काही दृश्यांनी या चर्चांना आणखी उधाण दिलं. दुसऱ्या वनडेनपूर्वी शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सरावादरम्यान गौतम गंभीर (Gautam Gambhir), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. पीटीआयच्या माहितीनुसार, थ्रोडाउनदरम्यान गंभीर यांनी कोहलीकडे पाहिलं, मात्र दोघे एकदा पण बोलले नाही.
टीम इंडियाच्या सराव सत्रात नेमकं काय घडलं?
माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने रायपुर वनडेनपूर्वी नेट्समध्ये बराच वेळ घालवला. त्याने आक्रमक फटके मारले आणि एका जोरदार षटकाराने आपला नेट सेशन पूर्ण केले. मात्र ज्याने या सीनियर खेळाडू आणि हेड कोच गंभीरच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांना पुन्हा हवा दिली, ते म्हणजे कोहली गंभीरच्या अगदी जवळून गेला, पण दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. रिपोर्टनुसार, रोहितही थोड्याच वेळात कोहलीच्या मागोमाग नेट्समधून बाहेर आला.
विराट–गंभीरमध्ये दुरावा?
नेट सेशनमध्ये काही मोठं घडलं नाही, पण कोहली–गंभीरच्या नात्यावर सर्वांची नजर लागली आहे. ऑक्टोबरमध्ये विराट भारतीय कॅम्पमध्ये परतल्यानंतर त्याला कोणत्याही ट्रेनिंग सत्रात गंभीरसोबत बोलताना पाहिलं गेलं नाही, ना ऑस्ट्रेलियात, ना या सिरीजमध्ये. जरी रांचीमध्ये कोहलीने शतक झळकावल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती, तरी नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला. ज्यात कोहली ड्रेसिंगरूममध्ये जाताना दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या गंभीरकडे पाहूनही काही बोलले नाहीत.
दुसरीकडे, कर्णधारपद गेल्यानंतर रोहित नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांना गंभीरसोबत संवाद करताना अनेकदा पाहिलं गेलं आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबतही रोहितच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित आणि विराट दोघांच्या वनडे करिअरबाबत मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. 2027 विश्वचषकाच्या योजनांमध्ये हे दोघे नाहीत, अशीही कुजबुज होती. पण दोघांनी मैदानावर आपल्या खेळाने या चर्चांना जोरदार उत्तर दिलं. रोहितने चार सामन्यांत तीन अर्धशतकं (त्यात एक शतक) ठोकली, तर विराटने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे.
हे ही वाचा -





















