Virat Kohli Records : एका मालिकेत सर्वाधिक द्विशतकांपासून ते सर्वाधिक शतकांपर्यंत, किंग कोहलीचे'हे' पाच विक्रम
Virat Kohli Announces Retirement : क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी काहीशी निराशादायक बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

Virat Kohli Records: क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी काहीशी निराशादायक बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) आपल्या निवृत्तीची घोषणा (Virat Kohli Announces Retirement) केली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही मोठी घोषणा केल्याचे समोर आले आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची माहिती दिली. अलिकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. त्यानंतर रोहितच्या निवृत्तीच्या अवघ्या पाच दिवसांनंतर विराट कोहलीनेही क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटला निरोप दिलाय. अशाप्रकारे, या स्टार फलंदाजाच्या 14 वर्षांच्या प्रदीर्घ युगाचा अंत झाला आहे. मात्र भारतीय संघासाठी विराट कोहलीचे योगदान अतुलनीय आहे, आणि कायम राहणार आहे. अशातच आपल्या सर्वोत्तम खेळीने विराट कोहली ने स्वता: चे नाव क्रिकेट विश्वात ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केलं आहे. त्याने आजवर केलेलं असंख्य रेकॉर्ड त्याला खऱ्या अर्थाने किंग कोहली करतात. दरम्यान विराट कोहली यांच्या आजवरच्या कसोटी क्रिकेट मधील रेकॉर्ड बद्दल अधिक जाणून घेऊया.
1 कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक धावा
विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीने 5864 धावा केल्या आहेत. या काळात विराट कोहलीने 20 शतकी खेळीही केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीपेक्षा जास्त धावा इतर कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेल्या नाहीत.
2. कर्णधार म्हणून विराटच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामने
कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा काढण्याव्यतिरिक्त, विराट कोहलीने सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही केला आहे. विराट कोहलीने 68 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. या सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजयाचा टक्का 58.82 इतका आहे.
3. आशियाई कर्णधार ज्याने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, सेना म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावरही खळबळ उडवून दिली आहे. विराट कोहली हा आशियाई कर्णधार आहे ज्याने सात देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या परदेशातील कसोटी कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने 36 सामने खेळले, त्यापैकी 16 सामने जिंकले, 15 सामने गमावले आणि 5 सामने अनिर्णित राहिले, म्हणजे ड्रॉ झाले.
4. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकले सर्वाधिक कसोटी सामने
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक विजय मिळवले आहेत. विराट कोहलीने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने 40 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 17 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर 11 सामने ड्रॉ राहिले.
5. कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके
भारताचे नेतृत्व करताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून, विराट कोहलीने टीम इंडियासाठी एकूण ७ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावांच्या डाव खेळल्या आहेत. कर्णधार म्हणून इतर कोणत्याही भारतीयाने हे केले नाही.




















