(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 संघा विराटला स्थान नाही, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Team India for IND vs WI : बीसीसीआयने वेस्टइंडीजविरुद्धच्या सामन्यांसाठी भारताचा टी20 संघ जाहीर केला असून यावेळी स्टार फलंदाज विराट कोहलीला संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Social Media Memes On Virat Kohli : भारतीय संघ (Indian Cricket team) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध सामने खेळणार आहे. यावेळी एकदिवसीय आणि टी20 असे दोन्ही क्रिकेट प्रकारांतील सामने पार पडणार असून टी20 सामन्यांसाठी संघ जाहीर झाला असून यावेळी स्टार फलंदाज आणि माजी कर्णधारलविराट कोहलीला संधी देण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या या मोठ्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मात्र मीम्सचा अगदी पाऊस पडत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ आधी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. 29 जुलै रोजी पहिला T20 ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना वॉर्नर पार्कवर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील अखेरचे दोन टी-20 सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवले जातील. या सामन्यांसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा झाली असून यावेळी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह ही मोठी नावं संघात नसल्याचं समोर आलं आहे. तर आर. आश्विन संघात परतला असून केएल राहुल (KL Rahul) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचंही या लिस्टमध्ये नाव असून ते फिट असल्यास सामनाही खेळू शकतात. पण या संघनिवडीतल विराटचं संघात नसणं एक मोठी गोष्ट मानली जात असून यामुळेच सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं असून मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील काही खास मीम्स पाहूया...
— neeraj. (@_masterofchase_) July 14, 2022
https://t.co/ianV4EcW2z pic.twitter.com/so9FnwOgxr
— योगेश चौहान (@iamyoge) July 14, 2022
Bhai aap Dream 11 par team bna lena. 🙄 pic.twitter.com/nmrsSPnrFb
— राहुल (@rahulpassi) July 14, 2022
— Professor ngl राजा बाबू 🥳🌈 (@GaurangBhardwa1) July 14, 2022
कसा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
- Legends League : लवकरच सुरु होणार लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम, सेहवागसह पठाण बंधूही उतरणार मैदानात