IND vs PAK : महामुकाबल्याआधी विराट बाबर आणि रिझवान जोडीसोबत करतोय नेट प्रॅक्टीस, समोर आला खास VIDEO
T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी विश्वचषकातील महामुकाबला रंगणार असून याआधी दोन्ही संघाचे कसून सराव करत आहेत.
India vs Pakistan : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला ऑस्ट्रेलियात सुरुवात झाली असून स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रंगणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी अवघं क्रिकेट जगत उत्सुक असून दोन्ही संघाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. सोमवारी ब्रिस्बेनमध्ये दोन्ही संघाचा सराव सुरु असताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यासोबत नेट प्रॅक्टीस करताना दिसला आहे.
विराट कोहलीकडून यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यात कोहली यावेळी शॉर्ट पिच बॉल्स खास खेळताना दिसला, यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानही त्याच्या शेजारी सराव करताना दिसले. बराच वेळ नेट प्रॅक्टीसनंतर कोहली टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडूनही टीप्स घेताना दिसला. दरम्यान कोहली आणि पाकिस्तानी सलामीवीर एकत्र नेट प्रॅक्टीस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
पाहा VIDEO-
Babar Azam, Mohammad Rizwan and Virat Kohli did a net session together! All three batting side by side#T20WorldCup pic.twitter.com/itIMkKsAgn
— 𝙰𝚓𝚠𝚊 𝙵𝚊𝚢𝚢𝚊𝚣 (@Babar4life) October 17, 2022
भारत आणि पाकिस्तान दोघेही सध्या सराव सामने खेळत असून भारतने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी मात दिली तर पाकिस्तानचा संघ मात्र इंग्लंडकडून 6 विकेट्सनं पराभूत झाला. भारताने सामन्यात आधी फलंदाजी करत 187 धावांचं टार्गेट ऑस्ट्रेलियाला दिलं. कांगारुनी देखील सुरुवातीपासून संयमी खेळी करत विजयाच्या दिशेने यशस्वी पाठलाग सुरु ठेवला. पण अखेरच्या दोन षटकात भारताच्या शमीसह हर्षलने बाजी पलटवली आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 180 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे भारत सामना 6 धावांनी जिंकला. दुसरीकडे पावसाच्या व्यत्ययामुळं इंग्लंड पाकिस्तान सामना 19-19 षटकाचा खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघानं आठ विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं 14.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदी फ्लॉप ठरला. या सामन्यात आफ्रिदीला एकही विकेट्स मिळवता आली नाही.
हे देखील वाचा-