Aus vs Ind 1st Test : कर्णधार संतापला! विराट कोहलीने केली मोठी चुक... टीम इंडियाला बसणार मोठा फटका, Video
जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडे मोडले.
![Aus vs Ind 1st Test : कर्णधार संतापला! विराट कोहलीने केली मोठी चुक... टीम इंडियाला बसणार मोठा फटका, Video Virat Kohli drops Marnus Labuschagne catch KL Rahul-Jasprit Bumrah Shocked Video Aus vs Ind 1st Test Cricket News Marathi Aus vs Ind 1st Test : कर्णधार संतापला! विराट कोहलीने केली मोठी चुक... टीम इंडियाला बसणार मोठा फटका, Video](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/49aabdf5f79bcb4681b12950599a4c9b17322659744001091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aus vs Ind 1st Test : जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडे मोडले. बुमराहने आपल्या घातक गोलंदाजीने कहर केला. ऑस्ट्रेलियन डावात उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ यांना बाद करून बुमराहने दाखवून दिले की तो किती धोकादायक गोलंदाज आहे. नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथला लागोपाठ दोन चेंडूंवर बाद करण्यात बुमराहला यश आले.
विराट कोहलीने केली मोठी चुक
दरम्यान, जगातील सर्वात चपळ आणि तल्लख क्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीने पर्थमध्ये मोठी चूक केली. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने नॅथन मॅकस्विनीला एलबीडब्ल्यू केले. पण त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर विराट कोहली स्लिपमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला असता. पण लॅबुशेनच्या बॅटीला बाहेरचा कट लागला. विराट कोहलीने दुसरी स्लिपमध्ये कॅच जवळजवळ पकडला होता, पण शेवटच्या क्षणी चेंडू त्याच्या हातातून निसटला.
One of the more extraordinary drops you'll see! #AUSvIND pic.twitter.com/LdxmEYeWQx
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
पर्थ कसोटीत पहिल्या डावात टीम इंडियाचे शेर 150 धावांवर ढेर
ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या जात असलेल्या पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे पहिले दोन फलंदाज खाते न उघडताच शून्यावर बाद झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतले. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाले. त्यानंतर विराट कोहली 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुलने 26 (74) धावांची खेळी खेळली.
ध्रुव जुरेल 11(20) धावा करून बाहेर पडला. वॉशिंग्टन सुंदर 4, हर्षित राणा 7, जसप्रीत बुमराह 8 धावांवर बाद झाला. नवोदित नितीश रेड्डीने भारतासाठी सर्वात मोठी धावसंख्या केली. त्याने कांगारू गोलंदाजांविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी केली. त्याने 59 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. पर्थ कसोटीतही कांगारूंच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फलंदाजी उघडण्याची संधी दिली नाही. जोश हेझलवूडने 4, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हे ही वाचा -
Video : तब्बल 9 महिन्यांनी भेटली संधी, 23 चेंडू खेळले पण पाटी कोरीच; देवदत्तला देव तारणार का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)