Video : तब्बल 9 महिन्यांनी भेटली संधी, 23 चेंडू खेळले पण पाटी कोरीच; देवदत्तला देव तारणार का?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल खेळत नाहीये.
IND vs AUS 1st Test Devdutt Padikkal : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल खेळत नाहीये. त्याच्या जागी व्यवस्थापनाने डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला संघात स्थान दिले आहे. पडिक्कलचा हा फक्त दुसरा कसोटी सामना आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र, पडिक्कलची ही ऑस्ट्रेलियातील पहिलीच कसोटी आहे. तो येथे भारत अ संघाकडून खेळला आणि धावाही केल्या, पण पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याची बॅट शांत राहिली.
तब्बल नऊ महिन्यांनंतर देवदत्त पडिक्कलला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले होते, मात्र 24 वर्षीय फलंदाज या सुवर्णसंधीचा फायदा उठवू शकला नाही. पर्थ कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्तने एकूण 23 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याला खातेही उघडता आले नाही.
Devdutt Padikkal dismissed for a 23 ball duck.#INDvsAUS #indvsauslive pic.twitter.com/In0yo8KIvU
— 𝓜𝓲𝓬𝓱𝓪𝑒𝓵 (@Michael81704) November 22, 2024
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात भारताला देवदत्त पडिक्कलकडून खूप आशा होत्या, पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो त्या अपेक्षांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. विरोधी संघासाठी डावातील 11वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हेझलवूडच्या शेवटच्या चेंडूवर तो कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
देवदत्त पडिक्कलने केले श्रीलंकेविरुद्ध पदार्पण
देवदत्त पडिक्कलने 7 मार्च 2024 रोजी धरमशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. यावेळी, त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने 103 चेंडूत 63.10 च्या स्ट्राइक रेटने 65 धावा काढल्या होत्या.
पर्थमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरताना दिसत आहे. पहिल्या दिवसाच्या उपाहारापर्यंत भारतीय संघाने केवळ 51 धावांच्या स्कोअरवर आपल्या चार मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वाल (0), केएल राहुल (26), देवदत्त पडिक्कल (0) आणि विराट कोहली (05) हे संघाबाहेर गेलेले खेळाडू आहेत.
हे ही वाचा -