एक्स्प्लोर

Virat Kohli 100th Test: राहुल द्रविडकडून 100व्या कसोटीची कॅप, भावूक विराटकडून जुन्या किश्श्याची आठवण

Virat Kohli 100th Test: विराट कोहली शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. सामना सुरु होण्यासाठी टीम इंडियाने कोहलीचा सन्मान केला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटला एक विशेष कॅप सोपवली.

मोहाली : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. विराट कोहली शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. सामना सुरु होण्यासाठी टीम इंडियाने कोहलीचा सन्मान केला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटला एक विशेष कॅप सोपवली. यावेळी विराट भावूक झाला आणि जुनी आठवण सांगितली.

प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहलीला विशेष कॅप सोपवल्यानंतर तो म्हणाला की, "शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्याकडे अंडर-15चा तो फोटो आजही ज्यात मी तुमच्यासोबत उभा आणि तुम्हालाच पाहत आहे."

विराट कोहलीने या विशेष प्रसंगी सगळ्यांचे आभार मानले. विराट म्हणाला की, माझी पत्नी इथे आहे. भाऊ स्टॅण्ड्समध्ये बसला आहे, कोच आहेत. आपली टीम इथे आहे, त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं." विराट कोहलीला जेव्हा टीम इंडियाकडून ही कॅप देण्यात आली त्यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्माही सोबत होती.

विराटने यावेळी बीसीसीआयचेही आभार मानले. "मी फक्त एवढंच सांगेन की आजच्या घडीला आम्ही तिन्ही फॉरमॅट, आयपीएलमध्येही खेळतो. नवी पिढी केवळ हेच पाहू शकते की मी क्रिकेटच्या सर्वात पवित्र फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळलो आहे."

दरम्यान राहुल द्रविडसोबतचा फोटो विराटने शेअर केला होता. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोबाबत विराटने लिहिलं होतं की, "अशाप्रकारचे क्षण तुम्ही कुठे पोहोचला आहात याची जाणीव करुन देतात. स्वप्न खरी होतात असं मला वाटतं."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल

... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा

धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 16 February 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सNew Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यूABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 16 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सBJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती

जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला

महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती

Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.