Vinod Kambli Net Worth : एकेकाळी करोडोंमध्ये खेळणाऱ्या विनोद कांबळीवर कुबेराची अवकृपा, आता महिन्याला किती पैसे मिळतात? जाणून तुम्हीही व्हाल थक्क
एक काळ असा होता जेव्हा कांबळीला कोणत्याही ओळखीची गरज नव्हती. तो करोडोंमध्ये खेळायचा....
Vinod Kambli Net Worth : भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात भारतीय संघातील सर्व खेळाडूंवर केवळ पैशांचाच वर्षाव होत नाही, तर त्यासोबतच त्यांना जनतेचे भरभरून प्रेमही मिळते. मात्र, ही चमक कायम राखणे खेळाडूंसाठी सोपे नाही. क्रिकेटमध्ये टॅलेंटसोबतच शिस्तीचाही महत्त्वाचा वाटा असतो. जर तुम्ही प्रतिभावान असाल तर तुम्ही भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळत राहाल, असे नाही. तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आणि शिस्त असेल तर, तुमच्याकडे थोडी प्रतिभा कमी असली तरीही त्यावर उपाय होऊ शकतो.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याचा बालपणीचा मित्र आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरला भेटताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक होत आहेत आणि विनोद कांबळीची सद्यस्थिती पाहून त्यांचा विश्वास बसत नाही. सुरुवातीला सचिनप्रमाणेच कांबळीही आपल्या कामगिरीने जगभर नाव कमावत होता, मात्र काही वर्षे नाव कमावल्यानंतर तो अज्ञाताच्या दुनियेत हरवून गेला.
विनोद कांबळी यांची एकूण संपत्ती
बॉलिवूड चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे आहे, 'क्या से क्या हो गया देखते हैं.' होय, ही ओळ भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर अगदी सुट होते. एक काळ असा होता जेव्हा कांबळीला कोणत्याही ओळखीची गरज नव्हती. तो करोडोंमध्ये खेळायचा, पण आता परिस्थिती अशी आहे की तो प्रत्येक कामाला दुसऱ्यावर अवलंबून आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकेकाळी विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज मानला जात होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती, पण क्रिकेटच्या दुनियेत एकत्र प्रवेश करूनही सचिन त्याच्या कितीतरी पुढे गेला आणि कांबळी तेथेच राहिला.
1972 मध्ये मुंबईत जन्मलेल्या विनोद कांबळीचे एकेकाळी उत्पन्न 1 ते 1.5 दशलक्ष डॉलर्स इतके होते. पण आधी क्रिकेट आणि नंतर वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी घसरण झाली. विनोद कांबळी यांचे वार्षिक उत्पन्न 2022 मध्ये 4 लाख रुपयांपर्यंत होते. 2025 मध्ये परिस्थिती आणखी वाईट आहे. एक तर तो अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त आहे आणि त्याशिवाय त्याचे उत्पन्नही फारसे नाही. विनोद कांबळी आता बीसीसीआयने दिलेल्या पेन्शनवर जगत आहेत. माजी डावखुरा फलंदाज आता त्याला बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 30,000 रुपये मासिक पेन्शनमधून त्याचा खर्च भागवतो.
विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द
मुंबईतील शालेय सामन्यात सचिन तेंडुलकरसोबत 664 धावांची भागीदारी करून खळबळ माजवणाऱ्या विनोद कांबळीने 1993 साली भारताकडून पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. त्याने शेवटची कसोटी 1995 मध्ये आणि शेवटची वनडे 2000 मध्ये खेळली.