एक्स्प्लोर

Vinod Kambli : कपिल देव यांनी साद घालताच विनोद कांबळीने स्वीकारली ऑफर; सचिन अन् स्वत:च्या आजारपणावरही केला खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेचा विषय बनला आहे.

Vinod Kambli Accept Kapil Dev Offer : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेचा विषय बनला आहे. अलिकडेच महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभात तो सचिन तेंडुलकरला भेटताना दिसला. त्या कार्यक्रमात त्याला खुर्चीवरून उठता पण येत नव्हते. त्याला चालतानाही त्रास होत असल्याचा एका व्हिडिओमधून समोर आला होता. 

तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी 1983 च्या वर्ल्ड कपच्या सहकाऱ्यांसह कांबळीला पुनर्वसनासाठी मदतीची ऑफर दिली. आता पहिल्यांदाच कांबळीने त्याची तब्येत सचिनसोबतचे नाते आणि रिहॅब बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपली प्रकृती आणि आर्थिक परिस्थितीही उघड केली.

कांबळीने ही स्वीकारली ऑफर

52 वर्षीय विनोद कांबळीने नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली. यादरम्यान त्याने कपिल देव यांची ऑफर स्वीकारली आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कांबळी म्हणाला, 'मी रिहॅबसाठी तयार आहे. मला जायचे आहे कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे.' याचा अर्थ तो 15व्यांदा रिहॅबसाठी तयार आहे. यापूर्वी त्याच्या जवळच्या मित्राने सांगितले होते की, कांबळी 14 वेळा रिहॅबसाठी गेला होता. त्याचबरोबर कपिल देव यांना मदत करण्यापूर्वी त्यांनी स्वत: यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अट घातली होती.

कांबळीने सांगितले की, त्याला युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात तो बेशुद्ध झाला होता. कांबळीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी मिळून काळजी घेत आहेत आणि आजारातून बरे होण्यास मदत करत आहेत. कांबळीने आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचा खुलासाही केला. बीसीसीआयकडून मिळणारे पेन्शन हेच ​​त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे, जिथून त्याला दरमहा 30 हजार रुपये मिळतात.

सचिनसोबत कसे आहे विनोद कांबळीचे रिलेशन? 

विनोद कांबळीने 2009 मध्ये सचिनबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर दोघांमधील बोलणे बंद झाले. सचिनने 2013 मध्ये निवृत्तीच्या वेळी आपल्या निरोपाच्या भाषणात कांबळीचा उल्लेखही केला नव्हता. काही दिवसांपूर्वी जेव्हा दोघे भेटले तेव्हा त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कांबळी 15 वर्षांनंतर आता त्या वादावर बोलला आहे.

मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, तेव्हा मी खूप निराश झालो होतो. म्हणूनच मी ती गोष्ट बोललो. सचिनने पुरेशी मदत केली नाही असे मला वाटले. कांबळीने खुलासा केला की, 2013 मध्ये सचिनने त्याच्या दोन शस्त्रक्रियांसाठी पैसे दिले होते. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे असे कांबळीने सांगितले आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

हे ही वाचा -

Ind vs Aus 3rd Test : धाकड खेळाडूची संघात एन्ट्री अन् रोहित-कोहलीची धाकधूक वाढली! गाबा कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
Home Loan EMI Calculator: घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
Home Loan EMI Calculator: घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Embed widget