Vinesh Phogat Prize Money : विनेश फोगाटला सुवर्णपदकासह मिळाले 16 कोटी रुपये? पतीने केला मोठा खुलासा
Vinesh Phogat Gold Medal : पॅरिस ऑलिम्पिक-2024 मधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अपात्र ठरलेली भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट शनिवारी भारतात परतली.
Vinesh Phogat Prize Money : पॅरिस ऑलिम्पिक-2024 मधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अपात्र ठरलेली भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट शनिवारी भारतात परतली. अंतिम फेरीत पोहोचूनही पदक हुकलेल्या विनेशचे विमानतळावरून गावात जंगी स्वागत करण्यात आले. तिच्या भव्य स्वागतावेळी विनेश फोगाट भावूक झाली. विनेश फोगटच्या स्वागतासाठी हरियाणातील लोक मोठ्या संख्येने दिल्ली विमानतळावर आले होते. विनेश फोगाटच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांच्या उत्साहाचा अंदाज यावरून लावता येतो की, विनेश फोगटला दिल्ली विमानतळावरून तिच्या घरी पोहोचायला तब्बल 13 तास लागले.
गावात मिळाले सुवर्णपदक
विनेश फोगाट यांचेही गावात जोरदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान गावातील ज्येष्ठांनी भव्य समारंभाचे आयोजन करून विनेश फोगाटचा सुवर्णपदक देऊन गौरव केला. हा सन्मान मिळाल्यानंतर विनेश फोगाट खूप आनंदी दिसत होती. या सोहळ्यात विनेश फोगाटवर सुवर्णपदकाशिवाय अनेक पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. जवळच्या ग्रामस्थांनीही विनेश फोगट यांचा रोख रक्कम देऊन गौरव केला.
16 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले?
विनेश फोगट शनिवारी फ्रान्सहून भारतात परतली. रात्री उशिरा ती तिच्या बलाली गावात पोहोचली, जिथे दुसऱ्या दिवशी तिच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो लोकांनी सहभाग घेत विनेशवर बक्षिसांचा वर्षाव केला.
दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विविध संस्था विनेश फोगटला बक्षिसाची रक्कम देण्याचा दावा करत आहेत.
या पोस्टनुसार, विनेश फोगाटला इंटरनॅशनल जाट महासभा, हरियाणा ट्रेड ऑर्गनायझेशन आणि पंजाब जाट असोसिएशनने प्रत्येकी दोन कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, विनेश फोगटला एकूण 16.30 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
विनेश फोगटच्या पतीने सांगितले सत्य
विनेश फोगटचे पती सोमवीर राठी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सत्य उघड केले आहे. त्यांनी X वर लिहिले की, 'विनेश फोगटला खालील संस्था, व्यापारी, कंपनी आणि पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत. तुम्ही सर्व आमचे हितचिंतक आहात, कृपया खोट्या बातम्या पसरवू नका.
निम्नलिखित संस्थाओं, व्यापारियों, कंपनियों और पार्टियों द्वारा विनेश फोगाट को कोई धनराशि प्राप्त नहीं हुई है. आप सभी हमारे शुभचिंतक लोग हैं, कृपया झूठी खबरें न फ़ैलाएँ. इससे हमारा नुक़सान तो होगा ही. सामाजिक मूल्यों का भी नुक़सान होगा.
— Somvir Rathee (@somvir_rathee) August 18, 2024
यह सस्ती लोकप्रियता पाने का साधन मात्र है. pic.twitter.com/ziUaA8ct1W