Vijay Hazare Trophy: 30 नोव्हेंबरपासून उपांत्य फेरीला सुरुवात; कधी, कुठं रंगणार सामने?
Vijay Hazare Trophy Semi Final 2022: विजय हजारे ट्राफीच्या सेमीफानयल सामन्याला बुधवारपासून म्हणजेच 30 नोव्हेंपासून सुरुवात होणार आहे.
Vijay Hazare Trophy Semi Final 2022: विजय हजारे ट्राफीच्या सेमीफानयल सामन्याला बुधवारपासून म्हणजेच 30 नोव्हेंपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आसाम (Assam), कर्नाटक (Karnataka) आणि सौराष्ट्र (Saurashtra) यांच्या सेमीफानयल सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सेमीफायनलचे सामने कधी, कुठं पाहायला मिळतील? यावर एक नजर टाकुयात.
कधी, कुठं पाहणार सामने?
विजय हजारे ट्रॉफी 2022 सेमीफायनलचे दोन्ही सामने डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यात 30 नोव्हेंबरला पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ए ग्राऊंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा सेमीफानयल सामना महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात (30 नोव्हेंबरला) गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बी ग्राऊंडवर होणार आहे. हा सामनाही भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होईल. दोन्ही उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. या स्पर्धेतील अंतिम सामना 2 डिसेंबर रोजी होणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी 2022 सेमीफायनल सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
पहिला सेमीफायनल सामना | कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र | 30 नोव्हेंबर 2022 | सकाळी 9 वाजता | नरेंद्र मोदी स्टेडियम ए ग्राऊंड (गुजरात) |
दुसरा सेमीफायनल सामना | महाराष्ट्र विरुद्ध आसाम | 30 नोव्हेंबर 2022 | सकाळी 9 वाजता | नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राऊंड (गुजरात) |
ऋतुराज गायकवाडची वादळी खेळी
विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाडनं उत्तर प्रदेशविरुद्ध धुव्वा उडवला. या सामन्यात त्यान 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. ज्यात 10 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. याशिवाय त्यानं एका सामन्यातील एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय.अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
हे देखील वाचा-