U19 Asia Cup 2025 Schedule : अंडर-19 आशिया कपचा धमाका उद्यापासून; वैभव सूर्यवंशी दिसणार अॅक्शनमध्ये...; भारत-पाक सामना कधी?, जाणून घ्या Schedule
U19 Asia Cup 2025 Schedule Marathi News : अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2025 स्पर्धेला गुरुवार 12 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

U19 Asia Cup 2025 Schedule Update News : अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2025 स्पर्धेला गुरुवार 12 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा सामना युएईशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात मलेशिया विरुद्ध पाकिस्तान अशी भिडणार आहे. दोन्ही सामने दुबईमध्ये पार पडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे ग्रुप एमध्ये आहेत. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये दुसरा सामना एकमेकांविरुद्धच होणार आहे. एकूण स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
IND U19 vs PAK U19 सामना कधी?
भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 यांच्यातील रोमांचक सामना 14 डिसेंबर 2025 रोजी खेळवला जाईल. हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदान येथे पार पडणार आहे. भारताच्या वेळेनुसार सामना सकाळी 10:30 वाजता सुरू होईल.
अंडर-19 आशिया कप 2025 – स्पर्धेचा फॉरमॅट
स्पर्धा 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान युएईमध्ये खेळली जाईल. 50 षटकाची टूर्नामेंट आहे. ग्रुप स्टेजनंतर नॉकआउट फेरी होईल. एकूण 8 संघ सहभागी असून, प्रत्येकी चार संघांचे दोन गट करण्यात आले आहेत.
- ग्रुप ए : भारत, पाकिस्तान, मलेशिया, युएई
- ग्रुप बी : अफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका
ग्रुप ए चे वेळापत्रक, वेळ आणि ठिकाण
12 डिसेंबर - भारत विरुद्ध युएई - सकाळी 10:30 (आयसीसी अकादमी मैदान)
12 डिसेंबर - पाकिस्तान विरुद्ध मलेशिया - सकाळी 10:30 (द सेव्हन्स स्टेडियम)
14 डिसेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - सकाळी 10:30 (आयसीसी अकादमी मैदान)
14 डिसेंबर - मलेशिया विरुद्ध युएई - सकाळी 10:30 (द सेव्हन्स स्टेडियम)
16 डिसेंबर - पाकिस्तान विरुद्ध युएई - सकाळी 10:30 (आयसीसी अकादमी मैदान)
16 डिसेंबर - भारत विरुद्ध मलेशिया - सकाळी 10:30 (द सेव्हन्स स्टेडियम)
ग्रुप बी चे वेळापत्रक, वेळ आणि ठिकाण
13 डिसेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश - सकाळी 10:30 (आयसीसी अकादमी मैदान)
13 डिसेंबर - नेपाळ विरुद्ध श्रीलंका - सकाळी 10:30 (द सेव्हन्स स्टेडियम)
15 डिसेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - सकाळी 10:30 (आयसीसी अकादमी मैदान)
15 डिसेंबर - बांगलादेश विरुद्ध नेपाळ - सकाळी 10:30 वाजता (द सेव्हन्स स्टेडियम)
17 डिसेंबर - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - सकाळी 10:30 वाजता (आयसीसी अकादमी ग्राउंड)
17 डिसेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध नेपाळ - सकाळी 10:30वाजता (द सेव्हन्स स्टेडियम)
ग्रुप स्टेजचे सामने 17 डिसेंबरपर्यंत चालतील. सर्व सामने दुबईतील आयसीसी अकादमी मैदान आणि द सेव्हन्स स्टेडियम येथे खेळवले जाणार आहेत. भारताच्या वेळेनुसार सर्व सामन्यांची सुरुवात सकाळी 10:30 वाजता होईल.
हे ही वाचा -





















