Sanju Samson : आकडे, परफॉर्मन्स सगळं भारी तरीही टीममधून OUT, मग कोण थांबवतंय संजू सॅमसनचा मार्ग?, जाणून घ्या Inside Story
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

India vs South Africa T20I : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) जुन्या सोशल मीडिया पोस्ट्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 2019 आणि 2020 मधील या पोस्ट मध्ये गंभीरने संजू सॅमसनला (Sanju Samson) खेळण्यासाठी समर्थक होते, हे स्पष्ट दाखवतात. त्या काळात गंभीरने संजूला भारताचा सर्वोत्तम विकेटकीपर-बॅट्समन म्हटले होते आणि वर्ल्ड कपमध्ये नंबर-4 वर खेळवण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले होते. परंतु, आता परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. गंभीर स्वतः टीम इंडियाचा हेड कोच आहेत, आणि संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे गंभीरची जुने पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. (Sanju Samson India vs South Africa T20I)
गंभीरची जुने पोस्ट, संजूवरील त्याचा विश्वास अन्... (Gautam Gambhir Old Posts)
गौतम गंभीरने 2019 आणि 2020 मध्ये संजूच्या समर्थनार्थ अनेकदा ठाम भूमिका घेतल्या होत्या.
22 सप्टेंबर 2020 रोजी एक पोस्ट : "हे खूप विचित्र आहे की संजू सॅमसनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळत नाही. बाकी सर्वजण त्याला खुल्या मनाने टीममध्ये घेण्यास तयार आहेत."
त्याच दिवशी आणखी एक पोस्ट : "संजू हा भारताचा बेस्ट विकेटकीपर-बॅट्समन तर आहेच, पण देशातील सर्वोत्तम युवा फलंदाजही आहे. कोणाला वाद करायचा असेल तर तयार आहे."
29 मार्च 2019 (वर्ल्ड कपपूर्वी) : गंभीरने स्पष्टपणे म्हटले होते की, संजूला भारताचा सर्वोत्तम विकेटकीपर-बॅट्समन मानले पाहिजे आणि त्याला वर्ल्ड कपमध्ये नंबर 4 वर खेळायला हवे.
सध्याची परिस्थिती संजूला जागा पक्की का मिळत नाही?
या सर्व पोस्ट संजूच्या क्षमता, प्रतिभा आणि कौशल्यावर गंभीरचा विश्वास स्पष्ट दिसतो. सध्या संजू सॅमसनला संघात आपले स्थान पक्के करण्यात अडचणी येत आहेत. शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे त्याला त्याचे सलामीचे स्थान गमावावे लागले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांनंतर जितेश शर्माला त्याच्या जागी संधी देण्यात आली आणि कटकमधील पहिल्या टी-20 मध्ये त्याला खेळण्याची संधीही मिळाली नाही. आकडेवारीनुसार, टी-20 मध्ये सलामीवीर म्हणून संजू सॅमसन शुभमन गिलपेक्षा आघाडीवर आहे. संजूच्या नावावर तीन शतके आणि एक अर्धशतक आहे, तर गिलच्या नावावर एक शतक आहे.
हे ही वाचा -





















