भारताची युवा ब्रिगेड सुसाट, विश्वचषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद, मुंबईकर मुशीर ठरला विजयाचा हिरो
IND vs IRE Match Highlights भारताने (Team India) आयर्लंडला तब्बल 201 धावांनी पराभूत केले आहे. मुशीर खान आणि नमन तिवारी भारताच्या विजयाचे हिरो ठरले. मुशीर खान याने शतकी खेळी केली तर नमन तिवारी याने चार विकेट घेतल्या.
U19 World Cup 2024, IND vs IRE Match Highlights : अंडर-19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. बांगलादेशनंतर भाराताने (IND vs BAN) आय़र्लंडचा (IND vs IRE ) पराभव केला आहे. भारताने (Team India) आयर्लंडला तब्बल 201 धावांनी पराभूत केले आहे. मुशीर खान आणि नमन तिवारी भारताच्या विजयाचे हिरो ठरले. मुशीर खान याने शतकी खेळी केली तर नमन तिवारी याने चार विकेट घेतल्या. भारताने आयर्लंडचा एकतर्फी भरभव करत 2 गुणांची कमाई केली. भारताच्या नावावर आता चार गुण झाले आहेत.
ब्लोमफाऊंटन येथे झालेल्या लढतीत आयर्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, भारतीय फलंदाजाने हा निर्णय चुकीचा ठरवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेटच्या मोबदल्यात 301 धावा केल्या. भारताकडून मुशीर खान याने 106 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 118 धावा चोपल्या. त्याशिवाय कर्णधार उदय सहारण याने 84 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. आयर्लंडकडून ओलिवर रिले याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारताने दिलेल्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 29.4 षटकात 100 धावंत ढेर झाला.
आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी झटपट बाद झाले. पण त्यानंतर मुशीर खान आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 151 चेंडूत 156 धावांची भागीदारी रचली. 75 धावा करुन कर्णधार उदय तंबूत परतला. त्यानंतर मुशीर खान याने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत आयर्लंडच्या गोलंदांजा समाचार घेतला. मुशीरने 106 चेंडूत 9 खणखणीत चौकार आणि 4 उतूंग षटकारांसह 118 धावांची शानदार खेळी केली. अरावेली अविनाशने 22 तर सचिन धसने 21 धावांच्या उपयुक्त योगदान दिले.
Musheer Khan's solid century has put India in command in Bloemfontein 👌#U19WorldCup #INDvIRE pic.twitter.com/3Eff90Nbvz
— ICC (@ICC) January 25, 2024
विराट आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची फलंदाजी ढेर -
भारताने दिलेल्या 302 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. सहाव्या षटकात त्यांना पहिला धक्का बसला. जॉर्डन नील 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आयर्लंडचा संघ सावरलाच नाही. ठरवीक अंतराने विकेट फेकल्या. रयान हंटर (13), स्कॉट मॅकबेथ (02), जॉन मॅकनली (00), , कार्सन मॅकुलॉ (00), कियान हिल्टन (09), ओलिवर रिले (15) यांना मोठी खेळी करता आली नाही. ठरावीक अंतराने विकेट गेल्यामुळे आयर्लंडचा डाव 100 धावांत संपुष्टात आला. भारताने 201 धावांनी विराट विजयाची नोंद केली. त्यामुळे भारताचा रनरेटही सुधारला आहे.
भारताच्या गोलंदाजांची कमाल -
302 धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर मारा करत ठरावीक अंतराने आयर्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडले. भारताकडून नमन तिवारी याने सर्वाधिक विकेट घेतल्या. नमन तिवारी याने 10 षटकात 53 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या. सौमी पांडे याने 9 षटकात 21 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. धनुष गौडा, मुरुगन अभिषेक आणि कर्णधार उदय सहारण यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
आणखी वाचा: