बुमराहला रिप्लेस करणार बॉबी देओल, सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल
Jasprit Bumrah Replacement : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा मैदानात परतण्याची वाट क्रिकेट चाहते आतुरतेने पाहत आहेत.
![बुमराहला रिप्लेस करणार बॉबी देओल, सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल Twitter flooded with memes Bobby Deol as Jasprit Bumrah replacement viral bowling video Celebrity Cricket League बुमराहला रिप्लेस करणार बॉबी देओल, सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/807736ced66d717a5e536aa43d7aca3a1677517855767265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jasprit Bumrah Replacement : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा मैदानात परतण्याची वाट क्रिकेट चाहते आतुरतेने पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वनडे मालिकेसाठीही बुमराहाला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दुखापतीमुळे बुमराह गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. आता आलेल्या वृत्तानुसार, बुमराह आयपीएलच्या आगामी हंगामातही खेळणार नाही. (Jasprit Bumrah Health Update) कदाचित आयपीएलमध्ये (IPL 2023) खेळू शकणार नाही. आयपीएलच्या संपूर्ण सीझनमधून बुमराह बाहेर राहू शकतो. जसप्रीत बुमराह आयपीएलमधूनही बाहेर गेल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं आणि संतापचे वातावरण आहे. नेटकरी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. तर काही चाहते मस्करी करत आहे. काहींनी बॉबी देओल याला बुमराहच्या जागेवर घ्या, असा सल्ला दिलाय.
सध्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) सुरु आहे. यामध्ये बॉलीवूडमधील अभिनेते खेळत आहेत. यामध्ये मुंबईच्या एका सामन्यात अभिनेता बॉबी देओलची गोलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी त्याला जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट घोषित केलेय. नेटकऱ्यांनी मजेदार मिम्स पोस्ट शेअर केले आहेत.
As #JaspritBumrah is all set to miss IPL2023, Mumbai Indians can pick him as his replacement pic.twitter.com/mG897SkezJ
— sudhanshu' (@whoshud) February 26, 2023
Bumrah going to play IPL after being mysteriously injured all year😭😭😭 https://t.co/hJFSAbVMWF pic.twitter.com/I2ccV8qnzO
— Rafay (@theslipscordon) February 19, 2023
Feeling sad for jasprit bumrah 😢 pic.twitter.com/DvNiP9vQ2w
— Arun Singh (@ArunTuThikHoGya) February 27, 2023
Jasprit Bumrah 💀 pic.twitter.com/f4V3Po1yUS
— Ankit (@revengeseeker07) February 20, 2023
His Dedication for his national team Mumbai Indians 🔥#jaspritbumrah #IPL #ipl2023 pic.twitter.com/1coBZiRdxV
— Heemal (@heemal_rwt) February 26, 2023
His Dedication for his national team Mumbai Indians 🔥#jaspritbumrah #IPL #ipl2023 pic.twitter.com/1coBZiRdxV
— Heemal (@heemal_rwt) February 26, 2023
पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह संघाबाहेर
बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 30 कसोटी, 72 वनडे आणि 60 टी20 सामने खेळळे आहेत. कसोटीत त्याने 128 विकेट घेतल्या आहेत. तर वनडेमध्ये 121 आणि टी 20 मध्ये 70 विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान खेळला होता. पण त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर पडावं लागलं होतं. आता जवळपास 8 महिने उलटून गेले आहेत. अशातच बुमराहच्या फिटनेसबद्दल समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल 2023 च्या सीझनमधून पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु क्रिकबझच्या एका बातमीनुसार, जयप्रीत बुमराह संपूर्ण सीझनमधून बाहेर राहण्याची जास्त शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)