एक्स्प्लोर

महिला, दिव्यांग अन् कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; आयसीसीचे अध्यक्ष बनताच जय शाह यांनी सांगितला प्लॅन!

Jay Shah ICC: आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला.

Jay Shah ICC: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष बनले आहेत. जय शाह (Jay Shah) यांना मंगळवारी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आले. 1 डिसेंबरपासून ते आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आयसीसीमध्ये महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर जय शाह यांनी महिला, दिव्यांग आणि कसोटी क्रिकेटबाबत भाष्य केले आहे. 

बीसीसीआयचा हवाला देत जय शाह (Jay Shah) यांनी आयसीसी अध्यक्ष (ICC Chairman) झाल्यानंतर सांगितले की, माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आणि आयसीसी अध्यक्षपदाची ही सन्माननीय भूमिका स्वीकारल्याबद्दल मी आयसीसी सदस्य मंडळाचे आभार मानतो. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की मी या महत्त्वाच्या भूमिकेत पाऊल ठेवताना , मी तुमच्या उच्च अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि क्रिकेटच्या सुंदर खेळासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी वचनबद्ध आहे. टी-20 हा एक रोमांचक फॉरमॅट असल्याने, कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही महिला क्रिकेट आणि दिव्यांग क्रिकेटवर अधिक संसाधने आणि लक्ष देऊन ते पुढे नेण्याचे विशेष प्रयत्न करणार असल्याचं जय शाह यांनी सांगितले

आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे शाह म्हणाले. क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी आयसीसी टीमसोबत आणि सदस्य देशांसोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचे असल्याचं जय शाह यांनी सांगितले. 

जय शाह 1 डिसेंबर 2024 पासून पदभार स्वीकारणार-

नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 

संबंधित बातमी:

जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव कोण होणार?; भाजपच्या मराठमोळ्या नेत्याचं नाव आघाडीवर!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
Solapur ZP Election : मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल; दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका
मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी मोठी अपडेट; वाहन चालकावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
Embed widget