रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, यशस्वी-संजू संघाबाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IND vs AFG Live Score : मोहाली येथे भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये पहिला टी 20 सामना होत आहे. तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत आगामी टी 20 विश्वचषकाची ( T20I World Cup 2024) तयारी होईल.
IND vs AFG Live Score : मोहाली येथे भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये पहिला टी 20 सामना होत आहे. तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत आगामी टी 20 विश्वचषकाची ( T20I World Cup 2024) तयारी होईल. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इब्राहिम जादरानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर रोहित शर्मा टी 20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरणार, हे निश्चित झालेय. यशस्वी जायस्वाल याला आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन, आवेश खान, कुलदीप यादव आणि विराट कोहली आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. त्याशिवाय अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि नूर अहमद खेळणार नाहीत. यशस्वी जायस्वाल दुखापतीमुळे पहिल्या टी 20 सामन्यासाठी उपलब्ध नाही.
पहिल्या टी 20 सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिव दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार
पहिल्या टी 20 सामन्यासाठी अफगाणिस्तानची प्लेईंग 11 -
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), रहमत शाह,अजमतुल्लाह उमरजई,मोहम्मद नबी,नजीबुल्लाह जादरान, करीम जनत,गुलबदीन नायब , फजलहक फारूकी,नवीन-उल-हक,मुजीब-उर-रहमान,
मोहालीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा
मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये टीम इंडियाने आतापर्यंत चार टी 20 सामने खेळले आहेत. यामधील तीन सामन्यात भारताचा विजय झालाय. तर एका सामन्यात पराभव स्वीकाराला लागलाय. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
आजपासून मालिकेला सुरुवात -
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्याची मालिका गुरुवार, 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मोहाली येथे होणार आहे. 14 जानेवारी रोजी इंदूर येथे होणार आहे. तर मालिकेतील अखेरचा सामना 17 जानेवारी रोजी बंगळुरुमध्ये होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी सात वाजता होणार आहेत.
अफगानिस्तानचा संपूर्ण संघ : इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब
अफगानिस्तान टी20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.