Team India : दम लगाके हैशा! बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी भारत सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले सरावाचे फोटो
India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. उद्या अर्थात रविवारपासून (4 डिसेंबर) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
![Team India : दम लगाके हैशा! बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी भारत सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले सरावाचे फोटो Team India training session in Bangladesh ahead of the IND vs BAN ODI series Team India : दम लगाके हैशा! बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी भारत सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले सरावाचे फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/d1c2a8be4308c46d958f16d402d44eb31670050934370323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs BAN ODI Series : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात ऑक्टोबर 2023 च्या सुमारास खेळवला जणार आहे. याचीच तयारी म्हणून भारत जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळत आहे. न्यूझीलंडनंतर भारत आता बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण पाच सामने खेळले जातील, ज्यात तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे.
यावेळी 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम पहिला कसोटी सामना होणार असून 22 ते 26 डिसेंबर रोजी शेर ए बांग्ला या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया बांगलादेशला पोहोचली देखील असून सध्या कसून सराव करत आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत.
बीसीआयनं शेअर केले सरावाचे फोटो
#BANvIND pic.twitter.com/4xYAOcaVNj
— BCCI (@BCCI) December 2, 2022
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेश एकदिवसीय संघ:
लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान. , आणि तस्किन अहमद
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)