एक्स्प्लोर

Ind vs Eng : श्रेयस अय्यर IN... सरफराज खान OUT; इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी निवडली Playing-11, पाहा कोणाला दिली संधी?

India Tour of England : बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघाची घोषणा केली आहे.

India Tour of England : बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघाची घोषणा केली आहे. या संघाची धुरा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आली आहे, तर राजस्थान रॉयल्सचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हा संघ इंग्लंडमध्ये दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये भाग घेईल.

देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे करुण नायर या संघात परतला आहे. विदर्भाकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 863 धावा केल्या आणि संघाला जेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. करुणने अंतिम सामन्यात 135 धावांची महत्त्वाची खेळीही खेळली.

पण, सर्वांचे लक्ष भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्यांना यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीकडे लागले आहे. 23 मे रोजी कसोटी संघाची घोषणा केली जाऊ शकते. त्याच दिवशी टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधारही ओळखला जाईल. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी कर्णधारपद रिक्त आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी निवडला संघ...

चाहते आणि क्रिकेट तज्ञ देखील इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांचे संघ निवडत आहेत. आता माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनीही इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. सिद्धूने आपल्या संघात श्रेयस अय्यर, करुण नायर आणि साई सुदर्शन यांना स्थान दिले आहे. करुण नायरने मार्च 2017 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर श्रेयसही बराच काळ कसोटी संघाबाहेर आहे. तर सलामीवीर फलंदाज सुदर्शनने आतापर्यंत भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

नवजोत सिद्धू यांनी ऋषभ पंतसह ध्रुव जुरेलची संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली. वेगवान गोलंदाजी युनिटमध्ये त्याने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांचेही नाव घेतले. सिद्धूने आपल्या संघात वेगवान अष्टपैलू शार्दुल ठाकूरला स्थान दिलेले नाही, तर नितीश रेड्डी संघाचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग असलेला मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानचा सिद्धूच्या संघात समावेश नाही.

एवढेच नाही तर नवज्योत सिंग सिद्धूने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग-11 संघाची निवड केली. या सामन्यासाठी त्याने त्याच्या प्लेइंग-11 मधून प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि करुण नायर यांना वगळले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. पण, सिद्धू यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये संघाचा कर्णधार कोण असेल याचा उल्लेख केला नाही.

इंग्लंड दौऱ्यासाठी नवज्योतसिंग सिद्धूचा 16 सदस्यीय भारतीय संघ

साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, करुण नायर.

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीसाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी निवडली Playing-11

साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget