Team India's FTP 2023-27: पुढील पाच वर्षात भारत पाकिस्तानशी एकही मालिका खेळणार नाही; चाहत्यांमध्ये निराशा
Team India's FTP 2023-27 Cycle Announced: आस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
Team India's FTP 2023-27 Cycle Announced: आस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) खेळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळला जाणार आहे. या सामन्यातील थरार पाहण्यासाठी दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळतेय. अलीकडं पार पडलेल्या आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने- सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांत द्विपक्षीय मालिका आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांच्या जखमेवीर मीठ चोळणारी माहिती समोर आलीय. टीम इंडियाच्या फ्युचर ऑफ टूर्स प्रोग्रामानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील पाच वर्षात एकही मालिका खेळली जाणार नाही.
बीसीसीआयनं आयसीसीला पाठवलेल्या फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये पाकिस्तानसमोरील कॉलम कोरा ठेवलाय. या एफटीपीनुसार भारत पुढील पाच वर्षांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक मालिका खेळणार आहे. भारत दरवर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत कसोटी आणि मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. ज्यामुळं पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणं भारतासाठी अशक्य आहे.
ट्वीट-
Future Tours Program announced! 📢
— Indian Cricket Team (@IndianCricNews) August 18, 2022
Take a look a the series list #TeamIndia will feature till 2027 🗒️ #Cricket #India #CricketTwitter pic.twitter.com/6VSJdPut8b
फोटो-
फोटो-
फोटो-
जवळपास 10 वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका नाही
भारतीय क्रिकेट संघ पुढील पाच वर्षांत 38 कसोटी (20 मायदेशात आणि 18 दूर्स), 42 एकदिवसीय (21 मायदेशात आणि टूर्स) आणि 61 टी-20 आंतरराष्ट्रीय (31 मायदेशात आणि 30 टूर्स) खेळेल. भारत मागील 10 वर्षांपासून पाकिस्तानशी कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळला नाही. पाकिस्ताननं 2012-13 मध्ये भारत दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. या एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर, टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. मात्र. त्यानंतर दोन्ही संघ आयसीसी टूर्नामेंटमध्येच एकमेकांसमोर आले.
टीम इंडियाचं बिझी शेड्युल
दरवर्षी एक आयसीसी स्पर्धा आणि इंडियन प्रीमियर लीगची विंडो वाढत असल्यानं भारत यावर्षी कमी सामने खेळेल. भारतानं शेवटच्या एफटीपीमध्ये द्विपक्षीय मालिकेअंतर्गत 163 सामने खेळले. तर, पुढील एफटीपीमध्ये भारताला 141 सामने खेळायचे आहेत. आयपीएलची विंडो 75 दिवसांवरून 80 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलीय.
हे देखील वाचा-