एक्स्प्लोर

Womens Asia Cup T20 2022: दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; श्रीलंकेकडून पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव

PAK W vs Sri Lanka W,  Womens Asia Cup T20 2022 Semi Final 2: श्रीलंका महिला आणि पाकिस्तान महिला यांच्यात (Pakistan Women vs Sri Lanka Women) आज महिला आशिया चषकातील दुसरा सेमीफायनल खेळला गेला.

PAK W vs Sri Lanka W,  Womens Asia Cup T20 2022 Semi Final 2: श्रीलंका महिला आणि पाकिस्तान महिला यांच्यात (Pakistan Women vs Sri Lanka Women) आज महिला आशिया चषक 2022 मधील दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. सेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. या चेंडूवर निदा दारनं फटका मारला. परंतु, पहिली धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ती रनआऊट झाली. ज्यामुळं श्रीलंकेच्या संघानं हा सामना अवघ्या एका धावेनं जिंकला. महिला आशिया चषक 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा संघ भारताशी दोन हात करेल.

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची कर्णधार चमारी अटापट्टूनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं निर्धारित 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 122 धावा केल्या. श्रीलंकेकडून हर्षिता मडवीनं 35, अनुष्का संजीवनीनं 26, निलाक्षी डी सिल्वानं 14 आणि हसिनी परेरानं 13 धावा केल्या. कर्णधार चमारी अटापट्टूनं 10 धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूनं तीन विकेट्स घेतल्या आहेत. सादिया इक्बाल, निदा दार आणि आयमान अन्वर यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

ट्वीट- 

अखेरच्या षटकात श्रीलंकेची भेदक गोलंदाजी
दरम्यान, 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  पाकिस्तान महिला संघाला 6 विकेट्स गमावत फक्त 121 धावाच करता आल्या. त्यामुळं श्रीलंका संघानं हा सामना एक धावेनं जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान मिळवला. पाकिस्तानच्या डावातील 18व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार बिस्माह मारूफ 42 धावांवर बाद झाल्यानं सामन्याचं रुप बदललं. त्यानंतर 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही पाकिस्ताननं आणखी एक विकेट्स गमावली. अखरेच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना निदा दार फक्त एक धाव घेऊ शकली आणि रनआऊट झाली. तिनं या सामन्यात संघासाठी 26 धावांचं योगदान दिलं.

फायनलमध्ये भारतीय महिला श्रीलंकेशी भिडणार
या विजयानंतर श्रीलंका संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. श्रीलंका संघ शनिवारी (15 ऑक्टोबर) महिला आशिया चषक 2022च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या दुसऱ्या आणि उभय संघातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता अंतिम सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे देखील वाचा-

WIPL:  महिला आयपीएलसाठी बीसीसीआयचा खास प्लॅन; पुढच्या वर्षी मार्चमध्ये 5 संघांमध्ये रंगणार टी-20 लीगचा थरार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थानला बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थानला बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
Embed widget