IND vs SA: है तय्यार हम! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 साठी भारत सज्ज, बीसीसआयनं शेअर केले सरावाचे फोटो
IND vs SA : ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी अखेरची टी20 मालिका सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडत असून आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
IND vs SA T20 Series : ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी भारतीय संघ एक प्रकारचे सराव सामने खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) भारत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत असून पहिला सामना भारताने जिंकला आहे. आता दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली असून सध्या कून सराव करत आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना भारताने 8 विकेट्च्या फरकने जिंकला. त्यानंतर आता दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवलं. खासकरुन युवा गोलंदाज अर्शदीपनं कमाल गोलंदाजी केली. दीपक चाहरनंही त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही संघाकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. सामन्यासाठी टीम इंडिया तितकाच कसून सराव करत असून या वेळेचे फोटो बीसीसीआयनं पोस्ट केले आहेत..
Snapshots from #TeamIndia's training session in Guwahati ahead of the 2nd T20I against South Africa.#INDvSA pic.twitter.com/vz6vc50ZO8
— BCCI (@BCCI) October 1, 2022
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर
हे देखील वाचा -