IND vs NZ, ODI : टी20 विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, वन डे सामन्यांची सर्व माहिती एका क्लिकवर
IND vs NZ: भारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी-20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
IND vs NZ OD Series : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उद्या अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. शुक्रवारी, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ऑकलंड येथे होणार आहे. या सामन्याद्वारे भारत 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीचा सराव सुरु करेल.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेचा विचार केला तर मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला पण अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार सामना अनिर्णीत सुटला आणि 1-0 अशा फरकाने भारताने मालिका जिंकली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
All in readiness for the #NZvIND ODI series starting tomorrow 💪#TeamIndia pic.twitter.com/OJH3MViV8u
— BCCI (@BCCI) November 24, 2022
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसी सामने टी20 सामन्यांप्रमाणे पाहता येणार असल्याने या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-