एक्स्प्लोर

Team India: रोहित-विराट आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार?; वरिष्ठ खेळाडूंबाबत जय शाह यांचं मोठं विधान

Team India Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टी-20 विश्वचषकासारखा संघ तयार केला जाणार आहे.

Team India Champions Trophy 2025: भारतीय संघाने 2 जून रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामध्ये रवींद्र जडेजाही सामील झाला आहे. रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.  आता भारताला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी करायची आहे. यामध्ये विराट आणि रोहित खेळणार की नाही यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिले आहे. 

जय शाह म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टी-20 विश्वचषकासारखा संघ तयार केला जाईल. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीही असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाणार आहे. हे वन डे फॉरमॅटमध्ये असेल. टीम इंडियाचे पुढील लक्ष्य हे आयसीसीचे जेतेपद आहे. यामध्ये विराट आणि रोहितही खेळणार आहेत. पीटीआयच्या एका बातमीनुसार, जय शाह म्हणाले की, टीम इंडियाने सर्व विजेतेपदे जिंकावीत अशी माझी इच्छा आहे. आमच्याकडे सर्वात मोठी बेंच स्ट्रेंथ आहे. या संघातील फक्त तीन खेळाडू झिम्बाब्वेशी खेळणार आहेत. आमचा संघ ज्या प्रकारे प्रगती करत आहे, त्यापुढील लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. यामध्येही अशीच टीम तयार करण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ खेळाडूही खेळणार असल्याची माहिती देखील जय शाह यांनी दिली.

रोहित-विराट वनडे आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करणार -

विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हे दोन खेळाडू आता टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाहीत. कोहली आणि रोहित आता वनडे आणि टेस्ट फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करतील. टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी युवा खेळाडूंची निवड केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार-

चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. यामध्ये एकूण 8 संघ 15 सामने खेळणार आहेत. पण कदाचित टीम इंडिया इथे खेळायला जाणार नाही. याबाबत अनेक प्रकारची विधाने समोर आली आहेत. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाऊ शकते. टीम इंडियाचे सामने इतर ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

India vs Zimbabwe चे वेळापत्रक-

पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे
दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे

संबंधित बातम्या:

Ritika Sajdeh Post For Rohit Sharma: 'मला खूप वाईट वाटलं...'; रोहित शर्माच्या निवृत्तीने पत्नी रितिका भावूक, पोस्टद्वारे सर्व बोलली

Virat Kohli-Rohit Sharma: 2 वर्ष थांबा,आता नको,पुढचा विश्वचषक भारतात; विराट-रोहितला ड्रेसिंग रुममध्ये समजवण्याचा प्रयत्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget