राहुलचे कमबॅक, चहलचा पत्ता कट, तिलकच्या रुपाने सरप्राईज, आशिया चषकासाठी भारताचे शिलेदार थोड्याच वेळात समजणार
Asia Cup 2023 Team India Squad : आशिया चषकासाठी बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेत.
Asia Cup 2023 Team India Squad : आशिया चषकासाठी बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेत. आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. त्यामुळे भारतीय संघ पूर्ण ताकदीने उतरणार आहे. आज दुपारी दीड वाजता आशिया चषकासाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समिती आज संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीच्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड उपस्थित राहणार आहे. आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातील खेळाडूच वर्ल्डकपमध्ये खेळतील. त्यामुळे आजच्या निवडीकडे लक्ष लागलेय.
राहुल-अय्यरचे पुनरागमन -
केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे आशिया कपसाठी पुनरागमन निश्चित मानले जात आहे. जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. त्याचीही आशिया चषक स्पर्धेसाठीही संघात निवड होणार आहे. प्रसिद्ध कृष्णाचीही आशिया कपसाठी निवड होऊ शकते. आशिया चषक स्पर्धेसाठी निवड समिती 17 खेळाडूंना संघात स्थान देणार आहे. मात्र, विश्वचषकासाठी केवळ 15 खेळाडूंची निवड होऊ शकते.
युजवेंद्र चहल बाहेर, तिलक सरपाईज पॅकेज -
आशिया चषक संघात तिलक वर्मा हे सर्वात मोठे सरप्राईज पॅकेज ठरू शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. तिलक याने पहिल्या मालिकेत दमदार फलंदाजीने खूप प्रभावित केले. तिलक वर्मा याला परिस्थितीनुसार खेळ कसा बदलायचा हे माहीत आहे. त्यातच तो डावखुरा आहे, त्यामुळे मधल्या फळीत त्याला संधी मिळे शकते. अय्यर याला पर्याय म्हणून तिलक वर्मा याची निवड होऊ शकते.
गोलंदाजीतही काही बदल पाहायला मिळतील. बुमराह, सिराज आणि शमीची निवड निश्चित आहे. मात्र, शार्दुलला कृष्णाच्या स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून जागा निवड निश्चित आहे. कुलदीप यादव मुख्य फिरकी गोलंदाज ठरू शकतो. मात्र, युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही आशिया कपसाठी संघात स्थान मिळू शकते. त्याशिवाय आर. अश्विन याचाही विचार केला जाऊ शकतो.
फिरकी गोलंदाज कोण ?
विश्वचषकासाठी पाच फिरकी गोलंदाजांमध्ये स्पर्धा आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजा, चायनामन कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्यामध्ये स्पर्धा रंगणार आहे. जाडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल हे फिंगर स्पिनर आहेत. तर कुलदीप यादव चायनामन गोलंदाज आहे. लेगस्पिनगर म्हणून युजवेंद्र चहल याने दावा ठोकलाय. आर. अश्विन याच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्याचा तगडा अनुभवा आहे. त्याशिवाय तो तळाला फलंदाजीही करु शकतो. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. उर्वरित दोन जागांसाठी तीन गोलंदाजात चुरस आहे.
आशिया चषकासाठी भारताचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, subject to fitness), श्रेयस अय्यर (subject to fitness), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युजवेंद्र चहल/आर अश्विन