एक्स्प्लोर

भारत की इंग्लंड कोण सरस? हवामान, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट, A टू Z माहिती 

IND vs ENG Semi Final 2024 T20 World Cup : उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे तेथील हवामान कसं असेल, याचा सामन्यावर परिणाम होणार आहेच. त्याशिवाय खेळपट्टीही महत्वाची ठरणार आहे. पाहूयात.. पिच रिपोर्ट, हवामानाचा अंदाज आणि हेड टू हेड स्थिती..

T20 World Cup 2nd Semi-Final, IND (India) vs ENG (England) Pitch Report And Guyana Weather Forecast : टी20 विश्वचषक 2024 मध्ये आता नॉकआऊट सामन्याला सुरुवात झाली आहे. गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि भारताचा सामना होणार आहे.  गयाना येथील मैदानात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. भारतीय वेळानुसार, रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे तेथील हवामान कसं असेल, याचा सामन्यावर परिणाम होणार आहेच. त्याशिवाय खेळपट्टीही महत्वाची ठरणार आहे. पाहूयात.. पिच रिपोर्ट, हवामानाचा अंदाज आणि हेड टू हेड स्थिती... 

भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचे सावट - (Guyana Weather Forecast On 27th June) 

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या नॉकआऊट सामन्यावर पावसाचे सावट आहे. मागील काही दिवसांपासून गयानामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारीही गयानामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुरूवारीही गयानामध्ये मुसळधार पावसाची शक्यता स्थानिक हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, पण अतिरिक्त वेळ ठेवण्यात आली आहे. उपांत्य सामना कमीतकमी 10 षटकांचा व्हायला हवा, असा नियम आहे. जर उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट ( India vs England Pitch Report)

प्रोव्हिडेंस स्टेडियम, गयानामधील खेळपट्टी (Providence Stadium Pitch Report) गोलंदाजांसाठी पोषक मानली जाते. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना या मैदानावर चांगली मदत मिळते.  पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारणं तितके सोपं नसेल. कारण, विस्फोटक फलंदाजी करताना विकेट जाण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना या खेळपट्टीवर जास्त मदत मिळत आहे. फिरकी गोलंदाजांना खासकरुन जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधल्या षटकात कोणता संघ जास्त धावा काढतो, त्यावर सामन्याचा निकाल लागू शकतो. टी20 विश्वचषक 2024 मध्ये या मैदानावर आतापर्यंत पाच सामन झालेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळलाय. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 127 इतकी होती, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणार्या संघाची सरासरी धावसंख्या 95 इतकी आहे. 

हेड टू हेड ( India vs England Head To Head)

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी20 मध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 23 टी20 सामने झाले आहेत. भारताने 12 सामन्यात बाजी मारली आहे, तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात न्यूट्रल ठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळवलाय. 

संभाव्य प्लेईंग 11 - 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,  शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह

इंग्लंड : फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), मोइन अली,  जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर

India and England Squads
 
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप साल्ट, रीस टॉपले, मार्क वूड

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
VIDEO : राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
Shivaji Patil VIDEO: आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Art Fair: मुंबई आर्ट फेअरमध्ये कलांचा महासंगम, २५० कलाकारांचा सहभाग
Shocking Video: बोरिवलीत महिलेवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज आले समोर
Language Row: कल्याणच्या DMart मध्ये मराठी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, MNS ने महिलेला विचारला जाब
Jogeshwari Negligence: 'नो बेल ओन्ली जेल', संस्कृती कोटियनच्या न्यायासाठी नागरिकांचा आक्रोश
Pattan Kodoli Yatra: 'बिरोबाच्या नावानं चांगभलं'चा गजर, भाकणुकीकडे लाखो भाविकांचे लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar : नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
VIDEO : राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
Shivaji Patil VIDEO: आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Embed widget