एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा भारतीयांच्या मनातालं बोलला; सेमी फायनलवरही केलं भाष्य

T20 World Cup 2024 Ind vs Aus: 2023 वनडे विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर-8 च्या फेरीत काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड पुन्हा एकदा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने 43 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. तो खेळत असेपर्यंत कांगारू विजयी मार्गावर होते. मात्र, 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला झेल बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकविला. 

नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला असला तरी रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी खेळून दाखवला. त्याने आपल्या डावात 7 चौकार आणि 8 षटकार मारले आणि यादरम्यान त्याने मिचेल स्टार्कच्या याच षटकात 4 षटकारही मारले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने मोठा विश्वविक्रम देखील केला. टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा पल्ला पार करणार रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 174 षटकारांची नोंद आहे.  दरम्यान, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला. 2023 वनडे विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्याची खंत भारतीयांच्या मनात होतीच. त्याचा बदला आज भारताने घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 

सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला? (Rohit Sharma Statment After Win Match Against Australia)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, Satisfying...(समाधानकारक), रोहितचा हा शब्द ऐकून त्याने भारतीयांच्या मनातील गोष्ट बोलल्याचे सांगितले जात आहे. रोहित पुढे म्हणाला की, आम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून काय धोका उद्भवला जाऊ शकतो, हे जाणतो. एक संघ म्हणून आम्ही चांगले केले, आम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी करत राहिलो. एक संघ म्हणून आम्हाला चांगला आत्मविश्वास देतो. 200 ही चांगली धावसंख्या आहे. पण जेव्हा तुम्ही इथे खेळत असाल तेव्हा वारा हा एक मोठा घटक आहे. मात्र आम्ही चांगले खेळलो, असं रोहित शर्माने सांगितले. 

उपांत्य फेरीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?

आम्हाला काही वेगळे करायचे नाही. त्याच पद्धतीने खेळायचे आहे आणि प्रत्येकाला काय करायचे आहे ते समजून घ्यायचे आहे. मोकळेपणाने खेळा आणि पुढे काय आहे याचा जास्त विचार करू नका. विरोधी संघाचा विचार करू नका, आम्हाला ते करत राहावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीबद्दल रोहित म्हणाला, हा एक चांगला सामना असेल, एक संघ म्हणून आमच्यासाठी काहीही वेगळे होणार नाही. 

सर्वात वेगवान अर्धशतक -

रोहित शर्माने 2024 टी20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या अॅरोन जोन्स याच्या नावावर होता. रोहित शर्माने फक्त 19 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. हे टी20 विश्वचषक 2024 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. 

2024 टी20 विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक 

रोहित शर्मा - 19 चेंडू
अॅरोन जोन्स - 22 चेंडू
क्विंटन डी कॉक - 22 चेंडू
मार्कस स्टॉयनिस - 25 चेंडू
शाय होप - 26 चेंडू

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Ind vs Aus: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट' नव्हे, अक्षर पटेलने घेतला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल

T20 World Cup 2024 Ind vs Aus: 6,6,6,6...मिचेल स्टार्कच्या षटकात रोहित शर्माचे चार षटकार; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget