Rishabh Pant : रिषभ पंतचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक, पार्थिव पटेल म्हणाला, त्याचं कौतुक करावं तितकं कमी, कारण...
Rishabh Pant : रिषभ पंत अपघातानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. रिषभ पंतच्या कमबॅकबाबत पार्थिव पटेलनं मत व्यक्त केलं आहे.
न्यूयॉर्क : भारत आणि आयरलँड(IND vs IRE) आज टी20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार आहेत. भारताच्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) मोहिमेची आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. भारतानं यापूर्वी बांगलादेशला सराव सामन्यात 60 धावांनी पराभूत केलं होतं. भारतीय संघ आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून जोरदार सलामी देण्याची शक्यता आहे. आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा संजू सॅमसन आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या दोघांपैकी एकाला विकेट कीपर म्हणून संधी देण्याची शक्यता आहे. रिषभ पंतचं नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. रिषभ पंत भारतीय क्रिकेट संघात तब्बल 527 दिवसांनंतर कमबॅक करु शकतो. अपघातात जखमी झाल्यानंतर दीड वर्षांपेक्षा अधिक काळ संघाबाहेर राहिल्यानंतर रिषभ पंत कमबॅक करणार आहे. रिषभ पंतच्या कमबॅक टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विकेटकीपर पार्थिव पटेलनं मोठं वक्तव्य केलं आहे. तो क्रिकबझच्या कार्यक्रमात बोलत होता.
पार्थिव पटेल काय म्हणाला?
रिषभ पंत ज्या गोष्टींना सामोरा गेला आहे..कधीही क्रिकेट खेळू शकणार नाही, असं वाटू शकतं त्या स्थितीतून त्यानं कमबॅक केलं. आहे. सर्वांसाठी तो एक आदर्श बनला आहे. जेव्हा विकेटकीपरचे तुमचे दोन्ही गडघे निघून जातात, शस्त्रक्रिया होतात. त्यानंतर कमबॅक केलं त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं पार्थिव पटेल म्हणाला.
आपण आयपीएलमध्ये त्यानं किती धावा केल्या हे मोजतो..अनेक गोष्टी आहेत, त्यानं जवळपास 450 धावा केल्या. रिषभ पंत विकेटकिपींग करु शकेल की नाही असा प्रश्न होता. पण त्यानं विकेटकिपींग चांगली केली.
रिषभ पंतला पुन्हा एकदा भारताकडून क्रिकेट खेळायला मिळणार आहे. तिथं तो चांगली कामगिरी करेल, अशा सर्वांची सदिच्छा आहेत. जिवघेण्या प्रसंगातून बाहेर पडून तो इथंपर्यंत पोहोचला, असं पार्थिव पटेल म्हणाला.
मनोज तिवारीनं रिषभ पंत दुर्मिळ हिऱ्यासारखा खेळाडू आहे, असं म्हटलं. आप नशीबवान आहोत की आपल्याला या सारखे खेळाडू मिळाले आहेत.जसं पार्थिव पटेलनं म्हटल की मी पण त्याच्याशी सहमत आहे. एक खेळाडू मरणाच्या दारातून परत आला आहे. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सराव सामन्यात अर्धशतक केलं, असं मनोज तिवारी म्हणाला.
आपण नशीबवान आहोत की आपल्याकडे विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आहे, जसप्रीत बुमराह आहे. आपण थोड्या चुका कमी केल्या तर कोणी रोखू शकणार नाही, असं मनोज तिवारीनं म्हटलं.
संबंधित बातम्या :