एक्स्प्लोर

BAN vs NED : बांगलादेशचा मोठा विजय, नेदरलँडला 25 धावांनी हरवलं, सुपर 8 मध्ये प्रवेशाची शक्यता वाढली...

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि नेदरलँड आमने सामने आहेत. दोन्ही संघ ड गटात दुसरं स्थान पटकवण्यासाठी लढत आहेत.

T20 World Cup 2024 किंग्जटाऊन : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) आज 27 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध नेदरलँड (BAN vs NED) आमने सामने आले. बांगलादेशनं शाकिब अल हसन आणि तंजिद हसनच्या फलंदाजीच्या जोरावर 5 विकेटवर 159 धावा केल्या. बांगलादेशनं नेदरलँड पुढं विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशचा प्रमुख फलंदाज शाकिब अल हसन यानं नाबाद 64 धावा केल्या. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये बांगलादेशच्या फलंदाजांनी चागंली फटकेबाजी करत 159 धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँडचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 134 धावा करु शकला. बांगलादेशनं 25 धावांनी ही मॅच जिंकली.

नेदरलँडला विजयासाठी 160 धावांचं आव्हान 

बांगलादेशची नेदरलँड विरुद्ध खराब सुरुवात झाली होती.  कॅप्टन नसमूल होसैन शांटोनं केवळ 1 रन करुन बाद झाला. लिटन दास देखील 1 रन करुन बाद झाला. यानंतर तंजिद हसन आणि शाकिब उल हसन या दोघांनी चांगली भागिदारी करत बांगलादेशचा डाव सावरला. तंजिद हसननं 35 धावा केल्या. तर, शाकिब अल हसन नाबाद  64 धावांची खेळी केली. तर, महम्मदुल्लाहनं 25 धावा केल्या. जाकेर अलीन 14 धावा केल्या. या सर्वांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशनं  5 विकेटवर 159 धावा केल्या. 

नेदरलँडचा कॅप्टन स्कॉट एडवर्डनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशनं नेदरलँडला विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेदरलँडनं चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यांना ती लय कायम ठेवता आली नाही. एम. लेविटनं 18 धावा केल्या. एमपी ओ दोऊदनं 12  धावा केल्या. विक्रमजित सिंगनं आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यानं 3 षटकार मारत 26 धावा केल्या. एंगलब्रेख्तनं 33 धावांची खेळी करत बांगलादेशला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. नेदरलँडचा कॅप्टन एसए एडवर्डसनं 25 धावांची खेळी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर 20 ओव्हरमध्ये नेदरलँडचा संघ 8 विकेटवर134 धावा करु शकला.  आजच्या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी नेदरलँडची सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता अजूनही कायम आहे. 

गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये शर्यत आहे. श्रीलंकेचा संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर गेलेला आहे.  बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यातील कोणता संघ सुपर 8 जाईल याचा निर्णय होताना नेट रनरेट देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

संबंधित बातम्या : 

T20 World Cup 2024: मोठी बातमी, नेदरलँडच्या बॉलरचा भेदक बाऊन्सर, बॉल थेट हेल्मेटमध्ये अडकला, बांगलादेशचा खेळाडू थोडक्यात बचावला

भारतानं वाचवूनही पाकिस्तान डेंजर झोनमध्ये, अमेरिका आयरलँड विरुद्ध एक बॉल न खेळता सुपर 8 मध्ये जाण्याची शक्यता कारण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget